Chhatrapati Shivaji Maharaj Book – Shri Shivbharat PDF Book | श्री शिवभारत

Shri-Shivbharat-PDF

Click here to Download Chhatrapati Shivaji Maharaj Book Marathi having PDF Size 87 MB and No of Pages 626.

गेल्या दोन अडीच हजार वर्षांपासून या भारतवर्षात लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या परिचयाचा असा जर कोणता ग्रंथ असेल तर तो महाभारत हा होय. या ग्रंथाने आपणा सर्व हिंदु लोकांना विशिष्ट प्रकारचे वळण लावलें, त्यांचे ध्येय निश्चितपणें सांगून दिलें, नीती अनीती, पाप पुण्य वगैरे अवश्यक कल्पनांचे स्वरूप विशद करून सांगितले, सर्व परिस्थितीतील लोकांचीं सामान्य व प्रासंगिक कर्तव्ये नमूद केली.

Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book

Name of Book Chhatrapati Shivaji Maharaj
PDF Size 87 MB
No of Pages 626
Language  Marathi
Buy Book From Amazon

About Book – Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book

आणि हे सर्व तात्विक व गूढ विषय समजाऊन देत असतां कथानके व उपकथानके यांची अशी उत्तम रीती ची सांगड घालून दिली कीं, तो ग्रंथ निरक्षरापासून तो जाडया विद्वानापर्यंत सर्व दर्जाच्या लोकांना पुनः पुनः वाचावा ऐकावा व मनन करावा असें वाटत असते. शिवाजी महाराजांच्या चरित्राची थोरवीहि अशाच जातीची उज्वल आहे. ही चिटणीसांची हकीकत गोष्ट या दृष्टीनें संगतवार आहे. पण ऐति हासिक प्रसंग या दृष्टीनें ती अशक्य कोटीतली आहे.

 

याचे कारण चिट णीसांच्या वर दिलेल्या विधानांत कालाच्या पौर्वापर्याचा विपर्यास अतोनात आहे व त्यांची माहिती अपुरी आहे. उपलब्ध विश्वसनीय माहितीच्या आधारे वर दिलेल्या ११ विधानाबद्दल असे म्हणतां येतें.

१. निजामशाही गादीवर लहानमुलें येऊन शहाजी वजीर बनण्याचा काळ शके १५५४ नंतरचा आहे. त्यावेळीं मलिकंबर व जाधवराव हे दोघेहि हयात नव्हते.

२. मलिकंबर व शहाची यांचे वितुष्ट शके १५४७ मध्ये आळें व शहाजी विजापुराकडे गेला. जाधवराव व शहाजी यांचे वितुष्ट शके १५४३ च्या सुमारास येऊन जाधवराव मोंगलांच्या आश्रयास गेला; तो ७८ वर्षांनी निजामशाहींत परत आला.

३. जाधवराव मोगलांसह येऊन शहाजीशीं लढला तो शके १५४६ मध्ये, चिटणीस समजतात त्याप्रमाणे माहुलीच्या वेढपांत नव्हे.

४. माइलीच्या वेढ्याचा प्रसंग शके १५५७/५८ मधला आहे. चिटणीसांनी तो १५४८ मध्ये मानला आहे.

५. शहाजी शके १५४७ मध्ये विजापूरकरांच्या नोकरीत गेला; तेव्हा शिवनेरी वगैरे भाग त्याच्या ताम्यति नव्हता. अर्थात् त्याला जिजा बाईस तेथे ठेवणे शक्य नव्हतें. जाधवराव तर मोगलांकडे होता यामुळे त्याचाहि संबंध या वेळी शिवनेरीस नव्हता. शहाजी विजापूरकराकडे ३ वर्षे राहून शके १५५० च्या सुमारास निजामशाहीत परत बाला व नंतर संभाजीच्या समासाठी जिजाबाईसुद्धा शिवनेरीस गेला.

६. शहाजी १९४८ शकांत विजापूरकरांच्या नोकरीत गेला. तेव्हां पासून तो अखेरपर्यंत त्याच दरबाराकडे राहिला अशी चिटणीसांची सम जूत असल्यामुळे याच सुमारास शहाजी व जिजाबाई यांची ताटातूट करून शिवजन्म शके १५४८ अगर १५४९ मानणे बखरकारांना व चिटणीसांना अवश्य वाटले. पण शहाजी पुनः निजामशाहीच्या नोकरीत गेला व त्यावेळी त्याचा शके १५५१ मध्ये शिवनेरीस जातां आले चिटणीसांना माहीत नव्हते.

Click here to Download Chhatrapati Shivaji Maharaj PDF 1 Book 

 

Click here to Download Chhatrapati Shivaji Maharaj PDF 2 Book 

राजवाडे यांची भूमिका- कै. राजवाडे यांनी डफचा ग्रंथ व बखरी यांचे विस्तृत परीक्षण करून विश्वसनीय शिवचरित्र लिहावयाचे असल्यास समकालीन कागदपत्र जमविण्याचे कंटाळवाणं काम प्रथम केले पाहिजे असा सिद्धांत मांडला व त्यास अनुसरून २५/३० वर्षे संशोधनाचें काम करण्यांत आयुष्य घालविलें हें सर्वश्रुतच आहे. या त्यांच्या कामगिरीनें शिवचरित्रविषयक कांहीं प्रसंगांना ऐतिहासिक प्रामाण्य आलें आहे.

हें प्रामाण्य कसें पारखावें या संबंधी त्यांनी तीस वर्षापूर्वी आपली मतें स्पष्ट पर्णे नमूद केली आहेत. त्यांवरून त्यांची भूमिका सहज कळण्याजोगी असल्यामुळे त्यांचेच शब्द येथे उतरून घेणे योग्य आहे. ” ऐतिहासिक प्रमाण व अप्रमाण यासंबंधीं माझीं मतें काय आहेत तें स्पष्ट सांगितल्यास पुष्कळ उलगडा होईल असें वाटतें. (१) समकालीन व्यक्तींनी सम कालीन प्रसंग साक्षात घडत असताना परमार्थानें लिहिलेले अगर लिहविलेले अस्सल पत्र किंवा त्याची नक्कल सर्वांशी जातीनें प्रमाण होय.

For More PDF Book Click Below Links….!!!

Mrutyunjay PDF

Yugandhar PDF

Chhawa PDF

Yayati PDF

Durga Kavach PDF in Hindi

Hanuman Chalisa PDF

Durga Chalisa PDF

(२) समकालीन व्यक्तींनी आपल्या हयातीतील गतकालीन प्रसंगांसंबंधी लिहिलेले लेख किंवा उल्लेख पहिल्या वर्गातील प्रमाणांच्या प्रातिकूल्याच्या अभावी जातीनें प्रमाण होत. (३) विषमकालीन व्यक्तींनी गतकाळासंबंधी लिहिलेले लेख ( अ ) पंचायतीपुढे प्रामणिक साक्षीच्या रूपाने दिले जात असल्यास आणि ( ब ) बखरी म्हणून योग्य आधाराने लिहिले असल्यास, केवळ स्मृतीवर भरवसा ठेवून लिहिलेले नसल्यास व आपल्या कामाचे योग्य शिक्षण मिळून लिहिलेले असल्यास जातीनें प्रमाण सम जावे.

ह्या तीन प्रकारच्या लेखखिरेरीज करून बाकी सर्व लेख कमजास्त प्रमाणाने अविश्वसनीय होत. 8 बारा मावळें काबीज केली-शिवाजी महाराज बंगळुराहून पुण्यास ” येतांच बारा मावळें काबीज केली ” असें सभासद म्हणतो. आणि इतर बखरकार सातव्या वर्षांपासून त्यांच्या पराक्रमास प्रारंभ झाला असें सांगतात. परंतु भारतकार या वेळीं महाराजांनीं अदभुत कामगिरी केल्याचे मुळीच सांगत नाहीत. उलट ते या प्रांतास आले तेव्हां त्यांचे थोरपण त्यावेळी लोकांनी जाणलें नाहीं असें तो स्पष्टपणे सांगतो.

पुढे देखील अनुकूल मंत्र्यांच्या सहाय्याने प्रजेला आनंद देत तो पराक्रमी शिवाजी राजा वाढू लागला, लोकही समृद्ध झाले, महाराजांचे गुण टो कांच्या लक्षात येऊं लागले आणि त्यांच्या गुरूंनाहि त्यांची विद्याग्रहणशक्ती पाहून आनंद झाला. पुढे पवार कुळांतील मुलीशी त्यांचे लग्न झाले त्या ‘वेळी ते ‘यौवनारंभी ‘ होत असें कवी सांगतो त्यावरून त्यांचे या वेळचें वय अंदाजे १५ वर्षांचें असावें असें म्हणता येईल. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book

या वेळीं मावळें काबीज करण्याची जी खटपट झाली ती दादाजी कोंडदेवाच्या हयातीत त्याच्याच पुढारपणाखाली करण्यात आली असली पाहिजे. याची हकीकत खं. १५ ले. ३०२ मध्ये आली आहे ती अशी :- ” आपले आजे कान्होजी जेधे स्वारानसी महाराज ( = शहाजी ) साहेबापासी चाकरी करीत होते. ते समई राजश्री छत्रपती कैलासवासी स्वामीस [ = शिवाजीस ] माहाराजानी पुण्यास ठेविले. त्या जवळी आपले आजे कान्होजी नाईक स्वारानसी राहिले. त्यावरी राजश्री दादाजी कोंडदेऊ सिवापुरास आले.

महमूदशहाचा शहाजहानाशी तह होऊन [ श. १५५८ मध्ये ] निजामशाही मुलुखाची वाटणी झाली तेव्हां कोकणचा बहुतेक प्रति आदिलशहाच्या वाट्यास आला होता तो त्यानें मुल्ला अहमद याजकडे व्यवस्थेसाठी सोपविला व पुणे आणि सुपे हे दोन परगणे शहाजीस जहागीर दिले. शहाजी जमेदाराच्या चालीप्रमाणे वतन संभाळून व आदिलशहाची चाकरी करून त्याच्या आज्ञेत वागत होता. पुढे कर्नाट काभ्या मोहिमेवर महमुदशहाने सर्व अमीरांना रवाना केलें त्यति शहाजी लाहि पाठविलें.

तेव्हा तिकडे जाताना शहाजीनें आपले दोन महाल आपला मुलगा शिवाजी याजकडे सोपविले. पुढे महमूदशहा आजारी पडून मृत्युपंथास लागला; तेव्हां आदिलशाही राज्यांत चोहीकडे फंदफितूर होऊन अव्यवस्था माजली; आणि कोंकणचा व्यवस्थापक मुल्ला अहमद यास बादशहाने ताबडतोब विजापुरास निघून येण्याचा हुकूम पाठविला. त्याप्रमाणे मुल्ला अहमद गेल्यामुळे कोकणांत अव्यवस्था माजली. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book

ही संधी साधून शिवाजीनें बंडाळी आरंभळी व किल्ले घेतले. इतक्यति महमूदशइ। मरण पावल्याची बातमी आली. तेव्हां शिवाजीला नवा दम येऊन त्यानें आपला उद्योग फारच जारीनें चालू ठेवला आणि चाळीस किल्ले ताब्यांत घेतले. शिवाजी भोसल्याची अशी दंगल वाढत चाललेली ऐकुन त्याच्यावर स्वारी करण्यासाठी अफजलखानाची रवानगी झाली.

त्याप्रमाणे खान शिवाजीवर पुणे प्रांतीच चालून जावयाचा. परंतु जावळीचा प्रतापराव मोरे विजापुरास दोन तीन वर्षांपूर्वी येऊन राहिला होता. त्याच्या मनांतून चंद्रराव हें पद आपणास मिळावें व शिवाजी कडून जावळी परत घ्यावी असें होतें. शिवाय जावळीचे ठाणे अशा नाक्याच्या जागी आहे की तो किल्ला हात असला म्हणजे सह्याद्री पर्वत व वाईप्रति यांवर तेथून हुकमत चालविण्यास अडचण पडत नाहीं.

हे लक्षांत घेऊन प्रतापरावाची इच्छा पुरविण्यासाठी खान वाई प्रांताकडे आला. त्यानें पंढरपूर व तुळजापूर येथील देवस्थानांना उपद्रव दिला (१८/१९ ) हें शिवभारतातील विधान शिवकालीन अस्सल पत्रावरून विश्वसनीय ठरतें. खंड २० ले. २१७ मध्ये ” क्षेत्रास ( पंढरपुरास ) खाने अजम अफजलखानाची तसवीस लागली ” असे शब्द स्पष्ट आहेत. या लेखांकावर शके १६१९ अशी मिति पडली आहे; ती चुकीची असून त्या ऐवजी श. १५८९ माघ २ ।१ अशी पाहिजे. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book

म्हणजे हा महजर अफजल प्रसंगानंतर आठच वर्षांनीं खुद क्षेत्रांतील जबाबदार अधि कायांनी लिहविला व त्यांत हे विधान आहे त्याअर्थी तें विश्वसनीय समजलें पाहिजे. अफजल प्रसंगाचे भारतातील वर्णन सारांश रूपानें मागें (पृ. २१ २६ ) सांगितलें आहे. त्याची पुनरावृत्ति येथें करण्याचे कारण नाही. तथापि अफजल प्रकरण क्रमाक्रमानें कसें रंगत गेलें हें पहाण्याजोगे आहे.

अली अदिलशहाने खानास रवाना केलें तें शिवाजीस जिंकून त्याला जिवंत पकडून आणण्याच्या हेतूनें केलें ( १७/३१ ) आणि अफजलानें केलेली प्रतिज्ञा याच प्रकारची होती ( १७/३७ ). खान वाईस आला तो (१) महाराजांना जिंकण्याच्या व पकडण्याच्या हेतूनें, (२) देवस्थानें भ्रष्ट करणारा असा लौकिक मिळवून (३) जावळी घेण्यासाठी आला. हे ऐकून महाराज जावळीस आले. यामुळे जावळी सहजासहजी हातीं घेण्याची कल्पना खानास सोडावी लागली.

त्यानंतर एकदम जावळीवर चालून जाणे किंवा जावळी देण्याविषयीं महा राजांशी बोलणें करणें हे दोन मार्ग त्याला मोकळे होते. पैकी दुसऱ्या मार्गाचें अवलंबन करून त्याने कांही अंशी जरबेचा व कांहीं अंशी तड जोडीचा निरोप पाठविला. या निरोपति महाराजांनी केलेल्या अनेक लहान मोठ्या कृत्यांचें परिगणन केलेले असून मोरे, मोंगल, अदिलशहा, दंडा राजपूरचा शिद्दी, मुसेखान इत्यादि अनेक शत्रु शिवाजी महाराजांच्या वागणुकीमुळे एकवटत आहेत. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Download

असे दाखवून त्यांना भिवविण्याचा खानानें प्रयत्न केला आहे. अर्थात या निरोपांतली भाषा स्वाभाविकपणेंच एक तर्फी व अतिशयोक्तीनें भरलेली अशी आहे. उदाहरणार्थ आदिलशहानें तह करण्याच्या इच्छेनें जो मुलूख मोंगलांना दिला होता तो शिवाजीनें मधन्यामध्यें टाटला ( १८/४८, ४९ ) हे अफजलखानाचे शब्द खुद्द औरंगजेबाच्या पत्रांत आले आहेत हें खरें; परंतु औरंगजेबानें हा मुलूख महाराजांना देऊन टाकण्याचीहि वाटाघाट चालू ठेवली होती.

एवढेच नन्हें तर खान चालून आला तेव्हा औरंगजेबाकडे महाराजांचा वकील गेलेला होता व मराठे आणि मोंगल यांच्यति अद्याप सलोखा कायम होता. त्याअर्थी खानानं दाखविलें मोंगलांचे भय अतिशयोक्तीने भरलेलें आहे. खानानें वाईस येतांच महाराजांना भिववून टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते भिऊन गेले आहेत अशीच त्याची समजूत होती. यामुळे प्रत्यक्ष भेटीच्या वेळी आपल्या जवळचें हत्यार खानाने शेजारच्या नोक राजवळ दिले व आपण निःशस्त्र आहों असा देखावा त्याने उत्पन्न केला.

या देखाव्यामुळे शिवाजी निःशंकमनानें कराराप्रमाणे आपल्याजवळ येऊन भेटेल आणि आपणासहि गुप्त कट्यार खुपसण्यास चांगली संधि सांपडेल असा खानाचा अंदाज होता. घाबरलेला शिवाजी आपल्याजवळ येऊन अंगाशी अंग कसे भिडवील याचीच त्याला विवंचना पडली होती. तो आपल्या हातांत सापडल्यावर त्याला जखमी करता येईल याविषयीं त्याला शंका नव्हती. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Download

खान स्वभावतः घमेंडखोर असल्यामुळे आपले कपट शिवाजी ओळखूं शकेल आणि आपल्या कट्यारीचा वार तो निष्फळ करील अगर डाव आपल्या अंगावर उल्टेल याची शंकाहि त्याच्या मनास शिवली नाही. परंतु महाराजांच्या अंगांत चिलखत असल्यामुळे खानाचा कटपारीचा वार फुकट गेला आणि प्रत्याघात न्यायानें महाराजांनी खाना च्या पोटांत तरवार खुपसली ती मात्र नेमकी लागू पडून खानाची आंतडी बाहेर पडली.

या वेळी महाराजांनीं तरवारीचा उपयोग केला व ही तरवार म्हणजे भवानी तरवार ( २०/१६, २२ ) असें परमानन्दानें सांगितले आहे. वाघनखाचें नांव त्यानें कोठेंहि घेतलेलें नाहीं. सभासदानें बिचवा व बाघनख ‘ असे शब्द योजिले आहेत (पृ. १६) त्या अर्थी बिचवा व बाघनख हे शब्द समानार्थक नाहींत में स्पष्ट आहे; व कै. साने यांनी बिचवा याचा अर्थ ‘ एक वाकडी कटपार’ असा दिला आहे.

बुसातिने सळातीन या ग्रंथातील या प्रसंगाची इकीगत अगदीच अविश्वसनीय दिसते. त्याचे तात्पर्य असें आहे. अफजलखान दहा हजार सैन्यासह आला व त्यानें शिवाजीचा कांहीं मुलुख हस्तगत केला तेव्ह शिवाजीनें लीनताप्रदर्शक पत्र पाठवून माफी मागितली. तेव्हा खानाने त्याच्याशी सख्य केलें. नंतर शिवाजीनें खानास मेजवानीनिमित्त प्रतापगड किल्ल्यावर बोलावलें; त्याप्रमाणें खान फक्त बारा लोकांसह किल्लयांत येत असतां शिवाजीच्या हत्यारबंद लोकांनीं त्याच्यावर गर्दी करून त्याला ठार मारलें. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Download

तेव्हां आपल्यास कोणी आवरता नाहीं असें समजून खानाची फौज सुसाट पळून गेली. अशा रीतीनें तडजोडीचें बोलणे लाऊन कपटाने घात करण्याची कल्पना शिवाजी महाराजांनीं योजली असें मुसलमानी लेखकांचं म्हणणें दिसते. पण ही कल्पना अफजलखानानीच होती हैं या प्रसंगानंतर एकच महिन्यानें [१० डिसेंबर ] लिहिलेल्या अस्सल पत्रांत नमूद आहे. राजापूर येथील इंग्रजी व्यापारी सुरतेतील आपल्या अधिकान्याला लिहि तांना म्हणतात:

१३ पन्हाळ्याचा वेढा-रुस्तुम व फाजल यांच्यावर जय मिळविल्या नंतर महाराज पन्हाळ्यास आले; आणि नेताजीनें कोल्हापूर, रायबाग, अथणी, तेलसंग तिकोटें इत्यादि विजापूरकरांच्या ताब्यांतील गांव व मुख लुटले व कांही हस्तगतहि केले. अशा प्रकारें अफजल ठार झाला, रुस्तुम पराभूत झाला आणि नेताजीनें विजापूरकरांचा मुलूख व्यापण्याचा सपाटा चालविला तेव्हा विजापूरकरांचे धाबे दणाणून गेलें.

मराठयांना आवरण्याचें काम आपल्या हातून होत नाहीं असें विजापूरकरांच्या मनानें पक्केपण घेतले आणि त्यानी दिल्लीकराकडे पूर्वी मदतीची याचना केली होती तिची पुनरुक्ती केली. पण दिल्लीकराकडे इकि पोंचून त्यांची मदत विजापुरास येऊन पोचणें दिनावधचिं काम होते. तोपर्यंत त्यांना मराठ्यांच्या सैन्यास थोपवून धरण्यासाठी काहींना कांहीं व्यवस्था केल्यावाचून गत्यंतर राहिलें नाही. तथापि विजापूर दरबारातील कोणीहि वजीर हैं काम पत्करण्या पुढे येईना. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

अशा वेळी कर्नूळाचा जहागीरदार शिद्दी जोहार यानें में काम करून दाखविण्याची हिंमत बांधली. हा शिदी स्वतः बंडखोरच होता. तो विजापूरकराविरुद्ध कारस्थानें करून शिरजोर बनला होता. यामुळे दरबारातील मुत्सद्यांची त्याच्यावर मर्जी नव्हती. पण मुत्सद्यांची मति कुंठित झाल्यामुळे जोहाराचें म्हणणें गोड मानून वेळ मारून नेण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला होता.

त्यांनी जोहाराचे सर्व अपराध माफ करून त्याला ‘ सलाबतखान ‘ हा किताब दिला आणि त्याची रवानगी शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याच्या कामी केली आणि त्यानें आपल्या माठेबा सैन्यासह पन्हाळ्यास वेढा दिला. सारांश शास्ताखानाने व्यापलेला मुलूख तद्दाअन्वयें व कायदेशीर रीतीनें मोंगलांचाच झालेला होता; तो त्यांनी ताब्यांत घेतला याबद्दल तकार करण्यापासून कांहींच फायदा नव्हता.

आणि महाराजांनी अशी तक्रार केल्याचेहि दिसत नाहीं. पुर्णे, चाकण वगैरे परगणे यावेळी जे एकदा मोंगलाच्या तान्यांत गेले ते कित्येक वर्षे त्यांच्याच तान्यति होते. महाराज आप्रघाडून परत आल्यानंतर तीन वर्षांनी श. १५९१ मध्ये मोगलांशी जेव्हा उघड युद्ध सुरु झाले तेव्हां हा मुलूख महाराजांनी जिंकून परत घेतला. तोपर्यंत सिंहगड व पुरंदर हे दोन किल्ले खेरीज करून बाकीचा मुलूख मोंगलांकडे होता. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

सारांश शास्ताखानाने व्यापलेल्या मुलूखावर व मिळालेल्या विजयावर संतोष मानून रहावें; स्याने याच्याहि पुढे पाऊल टाकण्याची खटपट करूं नये अशी महाराजांची इच्छा होती; आणि ती शास्ताखानास शेवटी मान्यहि झाली. मात्र प्रारंभी त्याने चढा ईचें धोरण पत्करून सह्याद्रीपलीकडे मराठयांनी घेतलेला मुलूख व्याप ण्याची ईर्षा धरली होती. परंतु उंबरखिंडीच्या युद्धति त्याच्या सरदारांना चांगली अद्दल घडल्यामुळे त्यांनी ” आपली ईर्षा अनाठायी आहे ” असें खानास स्वानुभवानें बजाऊन सांगितलें असें दिसतें.

या दृष्टीने उंबरखिंडीचा प्रसंग महत्त्वाचा आहे. त्याची चर्चा कर ण्यापूर्वी प्रथम येथे या युद्धासंबंधींची भारतातील इकीकत नमूद करूं.  उंबरखिंडीचें युद्ध-महाराज राजगडास परत आले त्यासुमारास शास्ताखानाने चाकण शहर व किल्ला ताब्यांत घेतला (२८/२८) व तो पुण्यास आला. तथापि त्याच्याशी या वेळीं सामना न देतां भरपूर पैसा मिळवून नंतर में काम हाती घ्यावे असे महाराजांनी ठरविले.

त्यांच्या सचिवांनी देखील ही योजना मान्य केली; पण शास्ताखान पुण्याहून पेट शिवाजी महाराजांना गाठण्यासाठी राजगडाच्या रोखाने चालून येईल हे उघड दिसत असल्यामुळे सह्यादीवरून मोगली सैन्य उतरत असतां त्याचा फडशा उडविण्याची व्यवस्था केली पाहिजे असे त्यानी सांगितलें आणि महाराजांनाहि ते सयुक्तिक वाटलें. त्याप्रमाणे मराठयांचे सैन्य स्था धोरणानें रवाना झाले. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

किंवा महाराज विशाळगडावर आल्यावर देखील त्यांना तेथे वेढण्याचा प्रयत्न आदिलशाही सैन्यानें केला पण तो सिद्धीस गेला नाहीं हेंहि आपणास माहीत नव्हतें. त्याचप्रमाणे इंग्रजी व्यापाऱ्यांच्या पत्रावरून महाराज पन्हाळ्याहून आषाढात गेले हैं। लक्षांत येत नाहीं; पन्हाळ्याचा वेढा श्रावणतिहि चालू आहे त्या अथी महाराज अपाप तेथेच असावे असें सकृद्दर्शनी वाटते; आणि याच कार णामुळे मो. सरकार यांनी या प्रसंगाचा काळ ‘ आगष्ट’ म्हणजे ‘श्रावण’ असा दिला आहे ( स. शि. च. पृ. ८४ ).

इंग्रजी पत्रांवरच विशेष भिस्त ठेऊन तारखा ठरविण्याचा प्रयत्न प्रो. सरकार यानी असा आणखी बऱ्याच ठिकाणी केला आहे. अफजलवधासारख्या महत्त्वाच्या प्रसंगाचा काल मराठीत अनेक ठिकाणी बरोबर दिलेला असून तो प्रो. सरकार यांच्या नजरेत भरला नाहीं व त्यांनी ‘सपटंबर महिना देऊन ठेवला याचें कारण देखील इंग्रजी पत्राप्रमाणे मराठीतहि विश्वसनीय मित्या देणारी सामुग्री आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षांत नीटशी आली नाहीं हें आहे.

या मुद्याची विशेष चर्चा करण्याचें हें स्थळ नव्हे. शिवाय शिवचरित्रास उप योगी पडणारा इंग्रजी व्यापाऱ्यांचा अस्सल निवडक पत्रव्यवहार स्वतंत्रपणे ग्रंथरूपाने रा. वासुदेवराव बेंद्रे यानी तयार केला आहे. तो इतिहास वाचकांपुढे मांडतांना हा मित्यांचा उहापोह ते करणार आहेत. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

पुढील धोरणाचा उहापोह – विशाळगडाडून महाराज राजगडास येऊन पोहोचले तेव्हा पुढे कोणतें घोरण स्वीकारावें हें ठरविणें अगत्याचें होतें. अफजलखानाने काढलेल्या कुरापतीस उत्तर म्हणून मराठ्यांनी गदग लक्ष्मेश्वरापर्यंत व विजापुरापर्यंत स्वाऱ्या केल्या. परंतु या स्वाया दुल्लडीच्या स्वरूपाच्या होत्या. यति मराठ्यांना धावपळ पुष्कळ करावी लागली व विजा पूरकरांचे नुकसानहि बरेच झाले.

पण या दुल्लुडीत व्यापलेला प्रदेश मरा ठयांकडे कायमचा टिकर्णे शक्य नव्हतें. विजापूरकरतिर्फे शिद्दीजोहार व मोंगलांतर्फे शास्ताखान यानी आपली प्रचंड सैन्ये आणून मराठयांच्या ताब्यांत गेलेल्या मुलखावर हल्ला केला तेव्हां त्यांच्या पुढे मराठ्यांना मुळींच टिकाव धरता येईना. संख्येच्या दृष्टीनें मराठयांचे सैन्य बादशाही सैन्यापुढें क्षुद स्वरूपाचे होते; आणि तेंहि गेल्या सात आठ महिन्यांतील धावपळीने थकलें

भागलेलें असें होतें. यामुळे कांहीं दिवस विसावा मिळाल्यावांचून त्याच्या हातून मोठी कामगिरी पार पडण्याजोगी नव्हती. हे ओळखून महाराजांनी पन्हाळा देऊन विजापूरकरांशीं समेट केला आणि शास्ताखानाशी देखील तडजोडीचें बोलणें चालू ठेवलें. शास्ताखानानें चाकण शहर, व तेथळा संग्रामदुर्ग किल्ला हस्तगत करून पुर्णे, सुर्वे, इंदापूर या परगण्यांत धुमाकूळ मांडला; आणि आपला मुक्काम पुण्यास कायम केला. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

सुपे परगणा अफजल खानातर्फे सिद्दी बिलाल व पांढरे यानी व्यापला होता, त्यांना घालविण्याचे काम मराठयांनी केलें असेल नसेल इतक्यांत शास्ताखानाच्या फौजांनीं तो मुलूख आपल्या ताब्यांत घेतला. त्याचें वर्णन खं. २० पृ. ७१ वर छापलेल्या एका टिपणांत असें आहे. “मोगलाईच्या नामजादी दिल्लीहून आल्या. अमी रुल उमराऊ शास्ताखान आला, ते समई मुलुक तमाम बोस जाला. सुभा जेजुरीस आला.

तेथून चाकणेचा किल्ला सर केला. त्यावरी सिद्धी बिलाल सुभा करून आपले तरफेनें ठाणियास पाठविला. त्याने कौल देऊन कोट सुपियांत मुस्तेद केला. मग आपण इंदापुरास गेला. ” अशा रीतीने शास्ताखानानें दंगल उडवून सोडली असतां महाराजांनी शास्ताखाना कडे वकील पाठवून तडजोड करण्याची व इनामदारांना आश्वासन देऊन त्यांचे मन आपणाकडे कायम ठेवण्याची खटपट केली. पण दोहीचाहि उपयोग झाला नाहीं असें दिसतें.

“कार्तिक मासी राजश्री सोनाजी पंडित शास्ताखानाचा निरोप घेऊन राजगडास राजियापासी आले.” असे जेधे शकावली सांगते. पण हा उल्लेख फार मोघम आहे. त्यावरून बोलाचालीत काय निष्पन्न झाले त्याचा अंदाज करतां येत नाहीं. त्याचप्रमाणे मराठ्यांच्या सरंजामी खात्यांतर्फे एक हुकूम यावेळीं जाहीर करण्यांत भाला तो खं. ८ ले ११ रूपाने आपणापुढे आहे. त्यति ” सरंजामी छ २४ रबिलाखर सन इहिदे सितैन अलफ (=श. १५८२ मार्ग. व. ११). Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

पुणे, व इंदापूर व चाकण, सुपें बारामती ऐसे इनाम आहेत. त्यास पेशजी आपणास मुकासा असतो अफजलखाना आधीं जेणें प्रमाणे तसलमती ज्यास में पावत असेल त्यास तेणेंप्रमाणे देणें ऐसा तह (=ठराव केला असे ” असे शब्द आहेत. यावरून पुणे, सुपें वगैरे परगणे महाराजाकडे मोकाशाच्या नात्यानें होते तेव्हां इनामदारांना कोही रकमा पोचत असत. अफजलप्रसंगानंतर त्यांचें मोकासेदाराचे

नातें राहिलें नाहीं तरी इनामदारांनीं आपल्या उत्पन्नाविषयीं फिकीर बाळ गण्याचे कारण नाही; त्या रकमा त्यांना देण्यांत येतील असे आश्वासन देण्यासाठी हा जाहीरनामा काढलेला आहे. वर सांगितलेले परगणे पूर्वी विजापूरकरांच्या ताब्यांतले होते. पण श. १५७९ च्या तहाने ते विजापूर करांनी मोगलांना देऊन टाकले असून ते आजपर्यंत मोगलांनी ताब्यांत घेण्याचेच काम काय ते राहिलें होतें.

तें शास्ताखानानें बजावले. अशा रीतीनें हा मुलुख शास्ताखानाच्या ताब्यांत आल्यानंतर त्याचा मोकासा शिवाजी महाराजांना देणें अगर न देणें मोंगलांच्या मर्जीवर अवलंबून होते. मार्गे और गजेब भावाशी भांडण्याकरिता उत्तरेकडे जाण्यास निघाला तेव्हां हे परगणे शिवाजी महाराजांकडे राहू देण्यास औरंगजेबानें मान्यता दिली होती. तीच त्याने आतां हि द्यावी असे बोलणे यावेळी शास्ताखानाकडे सोनाजीपंतानें लावले असावें असें दिसतें. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

तथापि हें बोलणें मान्य करण्याचा अगर अमान्य करण्याचा हक्क मोंगलाचा होता व त्यांनी तो अमान्य केल्यास त्या मुषा वर त्यांच्याशी भांडण करण्याचा इरादा महाराजांचा नव्हता. मोंगलांनी बिजापूरकराकडून तहानें मिळालेला मुलूख खुशाल ताब्यांत घ्यावा. पण या पलीकडे विजापूरकर व शिवाजी यांध्यामधील भांडणांत त्यांनी लक्ष घालूं नये अशी महाराजांची इच्छा होती.

मोंगल व विजापूरकर यांची सैन्यें एकमेकांस मिळून त्यानीं मराठ्यांचे राज्य बुडविण्याचा प्रयत्न केल्यास मराठ्यांचा टिकाव लागण्याजोगा नव्हता. त्या अर्थी शास्ताखानास विजा पूरकराशी ऐक्य करण्याची बुद्धी न होईल अशी व्यवस्था करणे सर्वांत महत्त्वाचें होतें. उंबरखिंडीचें युद्ध-महाराज राजगडास परत आले त्यासुमारास शास्ताखानाने चाकण शहर व किल्ला ताब्यांत घेतला (२८/२८) व तो पुण्यास आला.

तथापि त्याच्याशी या वेळी सामना न देत भरपूर पैसा मिळवून नंतर हे काम हाती घ्यावे असे महाराजांनी ठरविले. त्यांच्या सचिवांनी देखील ही योजना मान्य केली; पण शास्ताखान पुण्याहून थेट शिवाजी महाराजांना गोठण्यासाठीं राजगडाच्या रोखाने चालून येईल हे उघड दिसत असल्यामुळे सह्याद्रीवरून मोगली सैन्य उतरत असतां त्याचा फडशा उडविण्याची व्यवस्था केली पाहिजे असे त्यानी सांगितले आणि महाराजांनाहि तें सयुक्तिक वाटले. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

त्याप्रमाणे मराठयांचे सैन्य त्या धोरणानें रवाना झाले. अंदाजाप्रमाणे शास्ताखानाने कारतलब नावाच्या सेनापतीकडे सह्याद्री उतरून चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल ही ठाणी इस्तगत करण्याचे काम सोपविले; आणि बरोबर अनेक रजपूत सरदार दिले; शिवाय सुप्रसिद्ध ‘रायबागीण’ इचीहि योजना या मोहिमेंत शास्ताखानानें केली. हे सैन्य लोहगड नजीकच्या दक्षिणोत्तर मार्गानें एका पाउलवाटेनें पर्वतावरून खाली उतरले.

ही वाट संपताच दाट झाडी असलेले अरण्य होतें. तेथपर्यंत मोंगलांचे सैन्य येईपावेतो मराठे झाडीच्या आश्रयाने दडून राहिले होते, ते मोंगलांना दिसले नाहींत. नंतर उंबर खिंडीजवळ कारतलब येतांच मराठयांनी रणभेरी वाजवून युद्धास तोंड लावले. तेव्हां तुंगारण्याचा अधिपति मित्रसेन व अमरसिंह यांनी हिंमत धरून युद्धास रंग आणला. या उंबरखिंडीच्या युद्धाशीं रायबागिणीचा संबंध होता व तिनें शरण जाऊन आपली सुटका करून घेतली ही गोष्ट ठोकळ मानानें बखर – कारांना माहीत आहे.

परंतु उंबरखिंडीचा ठावठिकाण अगर या प्रसंगाचा काळवेळ याची त्यांना कल्पनाहि नाहीं असें दिसतें. सभासदाने हा प्रसंग सुरतेच्या दुसऱ्या लुटीहून महाराज परत येत असता वाटेंत घडला असें म्हटले आहे ! मोंगली इतिहासांत या प्रसंगाचा अर्थातच नामनिर्देश देखील नाहीं. यामुळे त्यावर अवलंबून शिवचरित्र लिहिणाऱ्या प्रो. सरकारांनाहि त्याचा उल्लेख करता आला नाही. जेधे शकावलीत हा प्रसंग श. १५८२ च्या माघात घडला व काहारतलबखान यासी लढाई जाली. Chhatrapati Shivaji Maharaj PDF Book Free

उंबरखिंडीस जुन जाले. राजश्री स्वामीची फत्ते जाली. त्यापासून खंडणी घेऊन वाट दिल्ही. ” अशी इकीकत दिलेली असून प्रो. सरकार ती लक्षांत न घेता शास्ताखानाने यावेळी माशा मारीत बसून कालहरण केलें ( period of inactivity ) असें म्हणून अँटडफचा त्यानी अनुवाद केला आहे. प्रो. सरकार यांच्या शिवाजी चरित्रांतील शास्ताखानाच्या आगमनाची हकीकत अलमगीर-नाम्याच्या आधारे देण्यांत आली आहे ती महत्वाची आहे यांत शंका नाही. पण ती एकांगी असल्यामुळे, सर्वस्वी तिष्यावर विसं बणे योग्य नाही. तिची पूर्तता करण्यास मराठी उपलब्ध हकीकत जमेस घरटीच पाहिजे.