Chhawa PDF Book by SHIVAJI SAWANT | छावा – शिवाजी सावंत

Chhawa-PDF-Book

Click here to Download Chhawa PDF Book by SHIVAJI SAWANT | छावा – शिवाजी सावंत Language Marathi having PDF Size 18.6 MB and No of Pages 438.

पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राउळातील दगड करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. राउळाचा गाभारा त्य टाकला. पुरंधरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दरुणीमहालात मात्र रोजाना तसा कुणबिणींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता. दरुणी बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता…

Chhawa PDF Book by SHIVAJI SAWANT | छावा – शिवाजी सावंत

Name of Book Chhawa
PDF Size 18.6 MB
No of Pages 438
Language Marathi
Buy Book From Amazon

About Book – Chhawa PDF Book

त्या मिटल्या दरवाज्यासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुक स्त्री-खानदान अस्वस्थपणे, चिंतागत जडावल्या येरझारा घेत होते. स्वतःच्य मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खान वेळा दरवाज्याला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने ‘आई जगदंबे, आई जगदंबे’ असे पुटपुटणे चालू ठेवले.

त्या होत्या जिजाऊसाहेब! शहाजीराजे भोसले यांच्या राणीसरका शिवाजीराजे भोसले यांच्या मातुश्री – आऊसाहेब ! भोसले कुळीचा कुंकुमकरंड ! जगदंबेला स्त्री-जातीच्या रूपात पडलेले सर्वांत गोमटे स्वप्न ! उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाज्यासमोर अशाच ये-जा व त्यांच्या शेजारीच दहाबारा हातांचा पल्ला राखून पुरंधरचे किल्लेदार नेताजी एका दगडी जोत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल् हातांचा वेढा भरला होता.

Click here to Download Chhawa PDF Book

रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरा आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं ना डुईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताब सावरीत होती. नाहीतरी चटक्या अंगाचीच असते !

आता सईबाईना पुरंधरावरून हलविणे भागच होते. बाळंतव्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभूबाळाचे रडणे थोपविले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबिला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाईनी सईबाई, पुतळाबाई यांच्यासह पुरंधर सोडला. मेणे राजगडाच्या वाटेला लागले.

Yayati PDF

Marathi Vyakaran PDF

Durga Kavach PDF in Hindi

Hanuman Chalisa PDF

Durga Chalisa PDF

Shiv Chalisa PDF

Aditya Hridaya Stotra PDF

Sundar Kand PDF

बाळराजांना खांद्यावर घेऊन भोई भुई तुडवू लागले ! बाळशंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड ! गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा ! सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला आस्मानी पक्षी! गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडविणारी बारा मावळांतील उच्चासनी पंढरी !

राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी ! किल्ले रायगड डोळ्यांच्या बाहुल्यांत आला. मेण्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गडउतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वासुदेवपंत हणमंते, प्रतापराव सिलीमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकवून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेणाउतार व्हायला आधार दिला.

मागच्या मेण्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईंच्यावरून कुणीतरी कुणबीण जित कॉबड उतरत होती. सईबाईंच्या सुकल्या देहाकडे आणि घरंगळणाऱ्या कांकणांकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला ! ‘सूनबाईचा मेणा पद्मावतीवर जाऊ द्या. आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे.” जिजाबाई सईबाईच्या मेण्याच्या भोयांकडे पाहत म्हणाल्या. Chhawa PDF Book

सईबाई, पुतळाबाई पुन्हा मेण्यात बसल्या. त्यांचे मेणे गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाऊ बोलत होत्या. राजे फक्त ऐकत होते ! राजगडावरच्या खाजगीच्या महालात जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राज्यांचा राणीवसा समोर उभा होता. भवती जळणाऱ्या चिराखदानांवर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वाती कुणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या.

आपला घडीव दगडांचा, चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावता करीत म्हणाले, “बाळराजे, पाहिलात तुमच्या आऊसाहेबांचा वाडा!’ मामांचे से बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा नि कसा भिडला ते बाळराजांना कळलेच नाही !! समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद, थोर दरवाज्यात आले. सुवासिनींनी आरती-तबके फिरवून त्यांची ओवाळण केली.

सोनमोहरांचा सतका त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टिपत होती. आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. “चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू.” बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत Chhawa PDF Book

म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले.. निंबाळकरांच्या त्या कबिल्यातील प्रत्येक स्त्रीच्या पायांना हात लावून वर उठताना शंभूराजे प्रत्येक चेहरा बारकाव्याने निरखत होते. तो सारा कबिला उजळ रंगाचा होता !! बाळराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. त्यांना हवा असलेला सावळा रंग’ कोठेच दिसत नव्हता.

पाहिजे असलेल्या मनातील धूसर आठवणाऱ्या चेहऱ्याच्या माटाशी जुळता मिळता असा कुणाचाच चेहरा-मोहरा नव्हता! हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हायच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरची बिछायत हात फिरवून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेला मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तबकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पायगतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हातांनी चेपू लागली.

त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिराखदानांच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. विसरा प्रहर टळतीला गेला. कुम्हारबाडीत संभाजीराजे, त्र्यंबकपंत आणि निराजीपंत कुंभाराच्या मेटावर होते. घोंगडीवर बसलेले संभाजीराजे विचाराच्या पाठलागाने हैराण होत होते. Chhawa PDF Book

आपसुख उठून बाहेर येत नूरगंजबागेकडून येणाऱ्या वाटेला डोळे लावीत होते. पुन्हा आत येऊन घोंगडीवर बैठक घेत होते. संभाजीराजांची उलघाल वाढीला लागली. … आणि आणि महाराजसाहेब आलेच नाहीत तर तर तर जेधेकाकांच्या संगतीने आज आभ्याबाहेर पडायचं. मथुरेच्या वाटेनं बाल परावची. मथुरा! कुठं आहे? कशी आहे? तेथून जमेल तसं मुलखात जायचं. आणि थोरल्या मासाहेबांनी विचारलं, ‘तुमचे आबासाहेब कुठं आहेत?” म्हणून तर ?

मासाहेब! किती दिवस झाले, त्यांच्या हातून कपाळी शिवगंध नाही रेखून घ्यायला मिळालं! आणि धाराऊ ? धाकल्या आऊसाहेब, रायाजी, अंतोजी, सैस, गोमाजीबाबा – ” त्यांच्या मनाचे राजपान वाहतीला लागले. ” टप् टप् 5 टप् ऽ” घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या कानी आल्या. त्यांच्या मनीचे विचार दूर उडाले. कमरेच्या हत्याराच्या मुठीवर पंजाची पकड चढवीत ते घोंगडीवरून ताडकन वर उठले. निराजीपंतांकडे एक नजर देत ते तरातर कुंभाराच्या मेटाबाहेर आले.

बाहेर श्रावणाची एक तुटकी सर शिपकारत होती. तिच्या जाळीदार चंदेरी पडद्यातून संभाजीराजांना दोन स्वार दुडक्या गतीने येताना दिसले. दोन्ही पोटाच्या डोक्यावर घेरेदार कंगणी पगा होत्या. त्या स्वारांपैकी सर्जेराव जेथे पुढे झाले. सामोरे येत त्यांनी संभाजीराजांना ‘चला, टाकोटाक निगायचं हाय.” ते दबकून बोलले. मुजरा केला, ” निघायचे ?” क्षणभर संभाजीराजे गलबलले. महाराजसाहेबांशिवाय निघायचे ? कुठे? कशासाठी? सर्जेरावांच्या पिछाडीला असलेला घोडाईत पायउतार झाला होता. Chhawa PDF Book Download

सर चुकविण्याचे ‘निमित्त’ करून त्याने थोडीशी मान झुकती ठेवली होती. त्या घोडाईताची सुराने, लगीने पावले पडत होती. पायीचे मावळी पायताण कुरकुरत होते. त्या पावला-पावलांबरोबर संभाजीराजांचे अंग वैशाखीच्या तापट घणीने तटबंदीचा दगडी साज सरसरून यावा तसे मोहरून उठले. “हे हे महाराजसाहेबच! मनाची वात डोळ्यांनी पटवून देताच संभाजीराजे पायझेप टाकीत पुढे सरसे झाले.

दोन दिवसांनंतर पाचाडी परतलेल्या राजांना शामजीने परस्पर गाठले. गोऱ्या साहेबाची आणि त्यांची भेटीची वेळही ठावून घेतली. ठरल्या वेळी पाचाडाच्या वाड्याच्या सदरेवर थॉमस निकल्स शामजीसह राजांच्या भेटीला आला. भेटीचे प्रयोजन सांगण्यासाठी शामजीने तोंड खोलले “दोन दिवसांपूर्वी आम्ही गडावर चढून युवराजांच्या कानी सारे घातले आहे.” शामजी राजांचा नूर बघण्यासाठी क्षणभर थांबला.

ते ऐकताच मात्र बैठकीवरून उठून राजे शामजीला अत्यंत थंडपणे म्हणाले, ” शेणवी, आजचा मुहूर्त आमच्या आणि साहेबांच्या भेटीस योग्य नाही ! आम्ही त्यांची भेट उद्या घेऊ !’ राजांनी शामजीला मुहूर्ताचे कारण सांगितले, पण ते खरे नव्हते! शामजी आणि थॉमस गडावर युवराजांशी काय बोलले हे राजांना माहीत नव्हते. बोलण्यात गैरमेळ नये यासाठी ते कळणे आवश्यक होते ! पडू Chhawa PDF Book Download

असे संभाजीराजांच्या भेटीत काहीच पदरी पडले नाही, तसे त्या भेटीतही थॉमससाहेबाच्या हातात काहीही पडले नाही! ‘शिव’ आणि ‘शंभो’ यांच्या भेटी घेऊन मिठासाठी आलेला थॉमससाहेब आळणी तोंडाने मुंबईला परतला ! पावसाने रिकीब भरली. धारा उधळीत मावळी आभाळ गर्जू लागले. रायगडाच्या कड्यांवरून लाल पाण्याचे गर्जते धबधबे झेपा टाकू लागले. पाखरे कोठारात अडकून पडली.

इरले डुईवर घेऊन हारकारा त्या पाणघाईत पाचाडहून निघून गडावर आला. त्याने खबर आणली, ” गारठ्याने मासाबांचं सांदं धरल्यात. दम्यानं लई उचल खाल्लीया.’ ” आबादान केलेल्या मारल्या वाघाच्या चरबीचे बुधले घेऊन संभाजीराजे पाचाडात उत्तरले. जिजाऊ पडूनच होत्या. वाड्यावरील म्हणसे त्यांच्या सेवेत दाखल होती. सारी देख चोख ठेवायला पुतळाबाई डोळ्यांत तेल घालून मंचकाजवळ उभ्या होत्या. तरीही युवराजांना बघून जिजाऊंना समाधान वाटले.

न कळणारा धीर वाटला. जिजाऊंसाठी म्हणून पाचाडात वस्तीत असलेले केशवपंडित दुपार टळल्यावर आले. त्यांनी दासबोघांची पोथी लाकडी अडंगीवर ठेवली. मृग तोंडावर आला तसे शंगारपुरावर चैतन्याची कशी झड उठली. सुभ्यात वार्ता आली होती. “कर्नाटकसुभा रघुनाथपंत हणमंते यांच्या देखरेखीखाली सुपूर्द करून छत्रपती महाराज मुलखाकडे परतीच्या वाटेला लागले. दिग्विजयी छत्रपती येताहेत. पावणेदोन वर्षांनंतर. जिंजीपासून गदग तोरगळपर्यंतचे नवे राज्य उठवून.’ ” Chhawa PDF Book Download

ही वार्ता ऐकताच केवढ्यातरी अनावर उत्साहाने संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. कारभारी परशरामपंत, खंडोजी यांना त्यांनी याद फर्मावले. भराभर त्यांच्या तोंडून आज्ञा सुटू लागल्या. “कारभारी, पुराच्या दक्षिणेला आंबवतीची वेस उठवा. तिथं चौपडा-नगाऱ्याची सिद्धता राखा. परशरामपंत, आबासाहेबांच्या परतीच्या तळाच्या रोखानं थैलीस्वार धाडा. लिहा आम्ही आगवानीसाठी, पायधूळ घेण्यासाठी शृंगारपुरी वाटेला डोळे लावून आहोत.

खंडोजी, निवडीचे घोडाईत हुजुराती पेहराव देऊन सिद्ध ठेवा. त्यांना आमच्या पाठीने दौडायचे आहे. तुम्ही आमच्या सोबतच राहा. कुचराई करू नका. खासे आबासाहेब परतीला लागलेत.’ ” महाराजांच्या परतीचा संभाजीराजांनी अंदाजाने धरलेला दिवस फुटला. पुराच्या दक्षिणेला, श्रीफळाचे तोरण हिंदोळणारी, आंबवतीची वेस उजळून निघाली. तिच्या बगलांना चौघडा, नगारा सिद्ध होता. घरट्या घरट्यासमोर, रयताऊ कुणब्यांनी गुढ्या चढविल्या.

भावेश्वरीच्या कळसावर तिकोनी भगवी पताका फडकू लागली. वाड्यावर राणूआक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांनी ठेवणीचे ठाण काढून साज केला. फारा दिवसांनी आज धाराऊनेही टोपपदरी लुगड्याची घडी अंगावर मोडली. केसरी टोप मस्तकी शोभणारे, जरीबतूचा जामा छातीवर दाटलेले, ठिबक्यांचा मांडचोळणा चढविलेले संभाजीराजे राणूअक्कांचे, येसूबाईंच्या आईसाहेबांचे दर्शन करून वाड्याबाहेर पडले. खंडोजीने दौडीची जनावरे व सरंजामी घोडाईत सिद्ध ठेवले होते. Chhawa PDF Book Download

“जय भवानी.” असे पुटपुटत संभाजीराजांनी घोड्यावर मांड जमविली. त्यांच्या मागे पिलाजी, गणोजीराजे आणि खंडोजी यांनी जनावरांवर बैठकी घेतल्या. त्यांच्या पिछाडीला उमाजी पंडित, केशवभट, कवी कुलेश असा पंडितमेळा स्वार झाला. सर्वामागे शंभर एक हुजराती घोडाईतांनी शिस्त धरली. संभाजीराजांनी इशारत देताच सर्व पथकांच्या आघाडीला असलेली, फुलमाळांनी सजलेली. पालखी भोयांनी उचलली. छत्रपतींना बैठक देण्यासाठी ती नेण्यात येत होती.

पथक चालले. संभाजीराजे आपल्या दिग्विजयी पित्याच्या स्वागतासाठी पुराची वेस ओलांडून कोसभर पुढे चालले. त्यांच्या छातीवरची माळ घोडचालीबरोबर हिंदोळू लागली. मन अनेक आठवणींवर हिन्कळू लागले. पावणे दोन वर्षांची उन्हा पावसातील मोहीम. आबासाहेब थकले असतील. पण तरीही ते हसत म्हणतील, ‘कशाला सामोरे यायची तकलीफ घेतलीत ? तुम्ही का परके आहात ? कशा आहेत आमच्या सूनबाई ?” सर्वासामने आम्ही कसा जाब देणार ?

मराठी फौजेच्या दोन फळ्या महाराजांनी केल्या. हंबीरराव, आनंदराव आपल्यासोबत घेऊन ते खासे धरणगाव, जालना असा म्होरा ठेवीत मोगलाईत उतरले. मोरोपंतांची सेना आदिलशाही सुटीत आज निपाली. धान्याचे बोद, वैरणीचे बैलगाडे अशी रसदे घेतली ही दिलेला पावती करण्यासाठी आपल्या फौजेसह संभाजीराजे कबिला घेऊन हलसंगीहून निघाले. इंदी, तोरगल मार्गावर अचानक त्यांची साबाजी घाटगे या आदिलशाही सरदाराशी गाठ पडली. Chhawa PDF Book Free

दिलेरची रसद तोडण्यासाठी साबाजी संभाजीराजांवर चालून आला. आमनेसामने हत्यारघाई जुंपली. कागलकर साबाजी घाटगे आणि संभाजीराजे दोघेही मराठा सरदार! पण एक आदिलशाहीकडून आणि दुसरे मोगलाईकडून एकमेकांवर हत्यार चालवू लागले! या चकमकीत साबाजी जायबंदी झाला. काढत्या पायाने शिबंदीसह आला तसा निघून गेला. रसदीचे तांडे घेऊन संभाजीराजे बहमनहळ्ळीला पोचले.

पावसाची बुरबुर हटण्याची दिलेर वाट बघत होता. चौवाटांनी त्याच्या फौजा एकवट होत होत्या. विजापूरला सर्जाखान, संभाजीराजे यांच्या मदतीने सुलतानी तडाखा देण्याची तो स्वप्ने बघत होता. मराठ्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या जागजागी चकमकी उड़त होत्या. एवढ्यात दिलेरला धसका देणारी पहिली खबर मोगलाईतून आली – “धरणगाव लुटा गया !

पावसाळा हटला. थंडीने तळ घरला. बहमनहळ्ळीच्या ठाण्यावर संभाजीराजे जनानी डेन्यात एका खाटल्यावर शालनामा पांघरून बसले होते. चिराखदानावर त्यांची नजर जखडून पडली होती. सारा तळ रात्रीच्या कुशीत शांत झाला होता. रात्रपहाऱ्याचे पठाण दूरवर देत असलेली गस्त चुकारपणे मध्येच कानी येत होती. राणूअक्कांचा डेरा लगतच होता. ल्यात मदनसिंहाला शेजारी घेऊन अक्कासाहेब सुख झाल्या होत्या. Chhawa PDF Book Free

संभाजीराजांच्या मनात येसूबाईची आठवण झिरपू लागली. त्यांची अनेक रूपे चिराखदानाच्या ज्योतीत संभाजीराजांना भास देऊ लागली. स्वतःला विसरून ते एकटक ज्योती निरखण्यात दंग झाले. थंडीने दाटलेले धुके फोडीत दिलेरच्या पठाणी फौजा विजापुरावर निघाल्या. आघाडीला दिलेर, संभाजीराजे, सर्जाखान ढालगजावरच्या हौदात बसले होते. राणूअका आणि दुर्गाबाई पठाणी जनान्याच्या तांड्यातील मेण्यांतून चालल्या होत्या.

त्या तांडवाला हत्यारबंद पठाणांचा कडेकोट पहारा होता. मोगली फौजा विजापूरपासून पाच कोसांच्या पल्ल्यावर येऊन ठाण झाल्या. मराठे झडपा घालून त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत होते. विजापुरात हलकल्लोळ माजला. आदिलशाही आता डुबणार पठाण विजापूर मरणाला घालणार! संध्याकाळ धरून महाराज कृष्णाजी भास्कर, बापूजी त्रिंबक, खंडोजी, कविजी यांच्यासह पन्हाळा उतरून शिराळापेठ्याच्या वाटेला कूच झाले. वारणा ओलांडून त्यांनी शिराळा गाठला.

भुईकोटासमोरच्या मैदानात संचणी होणाऱ्या मावळजवानांची भेट घेतली. एक दिवस शिराळ्यात मुक्काम करून छत्रपती सर्वांसह मलकापूरला आले. बापूजी त्रिंबकांच्या वाड्यात सदरेला मांडलेल्या बैठकीवर महाराज बसले होते. त्यांना बापूजींनी, ‘तुलाजी देसाई निकम भेटीला आल्याची’ वर्दी दिली. तुलाजींचा चेहरा त्रासिक, चिंताक्रांत दिसत होता. महाराजांना गुजरा घालून तो चिडीने बोलला, “धनी, आमी आपल्या सावलीला हाव का मोगलाईत ?” Chhawa PDF Book Free

‘काय आहे देसाई ? नीट सांगा.” महाराजांनी त्याला सुमार केला. “आमाकडं बिळाशी तर्फेच्या बारा गावाच्या देशमुखीचा भोगवटा हाय. तो शिराळा पेट्याला जोडून असता बळेच वारणखोऱ्याला जोडून आमास्नी गोत्यात घातलंया स्वामी, ” कुणी ? छत्रपतींची चर्या ताठर झाली. “वारणखोन्याचं देशमुख सोमाजी बांदलांनी.’ ‘काय म्हणतात हे देसाई ? एका तर्फेचा बारा गाव तोडून दुसऱ्या पेट्याला घेतला आहे बांदलांनी ” महाराजांनी बापू व कृष्णाजी यांच्याकडे वळून विचारले.

“श्री. निकमांचा गाव शिराळा पेट्याचा हे खरं आहे.” कृष्णाजी भास्करानी इतबार ‘आम्ही बांदलांना हे अन्यायाचं आहे, करू नका म्हणून सांगून थकलो. ते जुमानत नाहीत महाराज.” बापूजी बोलले. महाराजांची चर्या लालावून आली. त्यांनी कडक शब्दांत तुलाजीच्या खटल्याचा निवाडा दिला. ज्यात बांदलला ‘भिक्षा नको कुत्रं आवरा’ म्हणण्याचीच पाळी यावी. छत्रपती बापूजी त्रिंबक आणि कृष्णाजी भास्करांना म्हणाले, “आम्ही तुमच्या नावे आज्ञापत्रे देऊ.

या देसायांचे बारा गाव शिराळा पेट्यालाच जोडून चालवा. दुसऱ्याच्या स्थावरांला मनचाहा हात घालणाऱ्या सोमाजी बांदलांना कळू द्या की, तसे झाले की कशी कोंडमार होते. कविजी, बांदलाची वारणखोरीची देशमुखी सरकारी दिवाणात अमानत झाल्याचा हुकूम द्या!” तुलाजी देसाईच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. बापूजी, कृष्णाजी, कविजी साऱ्यांनाच समजून चुकले की, महाराज केवळ न्यायालाच कौल देण्यात तत्पर नाहीत, तर अन्यायाला खोडा घालण्यातही तयार आहेत ! Chhawa PDF Book Free

छत्रपतींची आव्हानी नजर सर्वावर फिरली. प्रत्येकाला मानविडा देण्यात आला. तीन हजार आरमारी चाकरांना सहा महिन्यांचा पगार आगाऊ आदा करण्यात आला. नागोठाणे, पेण, आपटे भागात एक फटका टाकून महाराज पन्हाळ्याला परतले. दोन दिवस झाले. नित्याप्रमाणे सोमेश्वराचे, रंगरूपी पिंडीचे दर्शन घेतलेले छत्रपती बालेकिल्ल्यात आले. बागलाण, गोवा, मुंबई, खानदेशात जाणाऱ्या खलित्यांचे मजकूर चिटणिसांना सांगितले.

माध्यान्हकाळ झाला. थाळ्याची वर्दी असल्याने महाराज सदर सोडून उठले. बाहेर आर्द्राच्या ढगांनी आभाळाला दाट छपरी धरली होती. तस्तावर धरलेल्या छत्रपतींच्या हातावर तस्त्याने पाणधार धरली. पोसाने हात टिपत माजदालनात मांडलेल्या चौरंगावर महाराज बसले. बाहेर हत्यारी पहारा फिरत होता. खंडोजी आणि म्हलोजीबाबा जंजिऱ्याच्या पणाची बातचीत करीत खडे होते. माळवदाच्या दगडी कठड्याला रेलून कवी कुलेश ढगभरले आभाळ न्याहाळत होते.

Leave a Comment