How to Win Friends and Influence People PDF in Marathi by Dale Carnegie

How to Win Friends and Influence People PDF in Marathi

Click here to Download How to Win Friends and Influence People PDF in Marathi having PDF Size 2MB and No of Pages 235.

जर या पुस्तकाचा तुम्हाला जास्तीतजास्त लाभ घ्यायचा असेल, तर एक अदृश्य गरज आहे. एक अत्यंत आवश्यक आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट, जिचे पालन करणे इतर कोणत्याही नियमापेक्षा किंवा तंत्रापेक्षा जरुरीचे आहे. तुम्ही इतर हजार नियमांचे पालन केले, पण हे तत्त्व पाळले नाहीत, तर हे सगळे व्यर्थ आहे; पण ही गोष्ट जर तुम्ही थेट हृदयापासून केलीत, तर तुम्ही इतर सूचना न पाळताही चमत्कार घडवू शकता. ही गरज कोणती आहे, जी चमत्कार घडवणार आहे? ती गरज आहे, अंत:करणापासून तीव्र इच्छा असण्याची. “मी लोकांशी जास्तीतजास्त सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करीन.’

How to Win Friends and Influence People PDF in Marathi

Name of Book मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा
Author  Dale Carnegie
No of Pages 235
PDF Size 2 MB
Language  Marathi
Buy Book From Amazon

About Book – How to Win Friends and Influence People PDF in Marathi

अशी तीव्र इच्छा मनात हवी. ही आंतरिक इच्छा तुमच्या मनात कशी जागेल? त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला हे सतत बजावत राहायला लागेल की, ही तत्त्वे किती महत्त्वाची आहेत. ही तत्त्वे पाळून तुम्ही तुमचे आयुष्य किती समृद्ध, परिपूर्ण आणि पूर्णत्वाने जगत आहात याचे चित्र मनाशी रंगवावे लागेल. तुम्ही तुमच्या मनाशी हे सतत म्हणत राहायचे आहे की, ‘माझी लोकप्रियता, माझा आनंद आणि माझी इतरांना वाटणारी किंमत ही मी लोकांशी कसे वागतो यावरच अवलंबून आहे.’

प्रत्येक प्रकरण सुरुवातीला घाई-घाईत वाचून घ्या. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये नेमके काय सांगितले आह, हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर लगेच पुढच्या प्रकरणाकडे जाण्याचा तुम्हाला मोह होईल; पण तसे करू नका. हं, जर केवळ मनारंजनासाठी तुम्ही हे पुस्तक वाचत असाल तर ठीक आहे! पण या पुस्तकाचा उद्देश केवळ तेवढाच नाही. हे पुस्तक तुम्ही तुमचे नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी वाचत आहात. म्हून न एक-एक प्रकरण पुन्हा पुन्हा वाचा. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम कमी वेळात दिसून येतील.मध्ये-मध्ये थांबून तुम्ही जे वाचत आहात त्यावर पुन्हा-पुन्हा विचार करा. स्वत:ला विचारा की, ह्या सूचना तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात कोठे आणि कशा बापरू शकता.  How to Win Friends and Influence People PDF in Marathi वाचताना हातात क्रेयॉन पेन्सिल, पेन किंवा मार्कर असू द्या. जेव्हा तुम्हाला एखादी सूचना उपयुक्त वाटेल आणि जी तुम्ही वापरू शकता असे तुम्हाला वाटेल तेव्हा ती अधोरेखित करा. अशा प्रकारे काही वाक्ये तुम्ही रंगीत पेन्सिलींनी अधोरेखित केलीत, तर पुस्तक अधिक वाचनीय होते आणि पुनर्वलोकन करण्यासाठीसुद्धा सोपे होते.

मला अशी एक स्त्री माहिती आहे, जी एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीची मॅनेजर आहे. प्रत्येक महिन्याला तिच्या कंपनीने इन्श्युअर केलेले कॉण्ट्रॅक्‍ट यो हावा हापुन्ह महिनोन्महिने, वर्षानुवर्षे वाचून काढते. असे ती का करते? कारण ती तिला समजले आहे की, तपशील लक्षात ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे. मी “जाहीर भाषणकला” या विषयावरील माझ्या पुस्तकासाठी दोन वर्षांपासून लेखन करत होतो, पण आधी मी काय लिहिले हे मला पुन्हा-पुन्हा वाचून पाहण्याची गरज पडत होती, कारण आपल्या विस्मरणशक्तीची गतीसुद्धा आश्चर्य करण्यासारखीच असते!

The Alchemist PDF In Marathi

Rich Dad Poor Dad Marathi PDF

The Power of Habit Marathi PDF Book

The 5 Am Club PDF In Marathi

म्हणून या पुस्तकापासून तुम्हाला अधिक काळ टिकणारे फायदे हवे असतील, तर हे पुस्तक वर-वर चाळू नका. एकदा सखोल वाचून झाल्यानंतरही दर महिन्याला या पुस्तकाचे पुनर्वलोकन करण्यासाठी काही तास राखून ठेवा. हे पुस्तक तुमच्या टेबलावर सहज नजरेस पडेल अशा ठिकाणी ठेवा. नेहमी त्याच्यावर नजर टाका. या पुस्तकामुळे तुमच्या वागणुकीत होणारी सुधारणा लक्षात घ्या. लक्षात ठेवा की, या पुस्तकात दिलेल्या तत्त्वांचा सतत वापर केल्याने व पाठपुरावा केल्यानेच हे सगळे सवयीचे होईल व त्याचा फायदा होईल. दुसरा काही मार्गच नाही.

बर्नार्ड शॉने असे म्हटले आहे, “तुम्ही जर एखाद्या माणसाला काही शिकवायचा प्रयत्न केलात, तर तो ते कधीच शिकत नाही.” शॉ म्हणतो ते बरोबर आहे. शिकणे ज्याचे त्यानेच करायचे असते. How to Win Friends and Influence People PDF in Marathi आपण काहीतरी करूनच काहीतरी शिकतो म्हणून तुम्हाला जर या विद्येत पारंगत व्हायचे असेल, तर या पुस्तकाचा अभ्यास करा. जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे नियम लावून पाहा. जर तुम्ही असे केले नाहीत, तर तुम्ही हे सगळे लवकर बिसराल. जे तत्त्व वापरले जाते, तेच तुमच्या मनाला चिकटून असते. अशीही शक्‍यता आहे की, नेहमीच या सूचना वापरणे तुम्हाला अवघड वाटेल.

हे मला माहिती आहे की, जरी मी हे पुस्तक लिहिले असले तरी मलासुद्धा प्रत्यक्ष व्यवहारात या सूचना आणणे काही वेळेस अवघड वाटते. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा नाराज असता तेव्हा दुसऱ्याचा दृष्टिकोन समजावून घेण्यापेक्षा त्याला दूषणे देणे व त्याच्यावर टीका करणे हे अधिक सोपे असते. दुसऱ्याची स्तुती करण्यापेक्षा दुसऱ्यावर टीका करणे हे अधिक सोपे असते. इतरांना काय हवे आहे हे सांगण्यापेक्षा आपल्याला काय हवे आहे हे सांगणे सोपे असते, म्हणून हे पुस्तक वाचताना असे लक्षात घ्या की, तुम्ही फक्त माहिती गोळा करत नाही आहात, तर तुम्ही तुमची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करत आहात आणि साहजिकच हे मिळवण्यासाठी वेळ, चिकाटी आणि त्या ज्ञानाचा व्यावहारिक वापर करणे गरजेचे आहे.

मानवी नातेसंबंधांवरची ही एक व्यवसायमाला आहे असे समजा. जेव्हा-केव्हा एखाद्या समस्येबद्दल संघर्ष करण्याची वेळ येईल, म्हणजे मुलांबरोबर संघर्ष किंवा पती/पत्नीला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणे किंवा एखाद्या गिऱ्हाइकाची समजूत पटवणे किंवा त्रासदायक क्‍्लाणंट्सशी जमवून घेणे, अशा वेळी गडबडून जाऊ नका. ते चुकीचे आहे. How to Win Friends and Influence People PDF in Marathi त्याऐवजी या पुस्तकाची पाने उलगडा आणि अधोरेखित केलेले परिच्छेद पुन्हा-पुन्हा वाचा. ही नवीन शैली आपल्याला लागू पडते का पाहा आणि खरेच किमया घडेल!

या पुस्तकातील एखाद्या तत्त्वाचे जर तुम्ही उल्लंघन केले व ते तुमच्या मुलांच्या किंवा जोडीदाराच्या किंवा व्यावसायिक जोडीदाराच्या लक्षात आले, तर त्यांना एक रुपया दंड म्हणून द्या. त्यायोगे या खेळात तुम्ही प्रावीण्य प्रास करू शकाल. बॉल स्ट्रीटवरील एका बँकेच्या अध्यक्षाने मला असे सांगितले की, स्वत:मध्ये सुधारणा करण्याची एक नवीनच पद्धत त्याने शोधून काढली. खरेतर या माणसाचे शिक्षण फार नव्हते पण तरीसुद्धा तो एक महत्त्वाचा अर्थशार्ज्ञ समजला जात होता. त्याच्या यशाचे गमक त्याच्याच शब्दांत वाचा : “अनेक वर्षांपासून माझ्याकडे एक मुलाखतींची वही मी जवळ बाळगतो. मंपूर्ण दिवसभरात मी ज्यांना भेटलो त्याचा तपशील त्यामध्ये असतो.

माझे कुटुंब ुंब शनिवारी रात्री मला कोणत्याच कार्यक्रमात गृहीत धरत नाही, कारण त्यांना माहिती असते की, त्या काळात मी आत्मपरीक्षण करतो आणि माझ्या वागण्या-बोलण्याचे पुनर्वलोकन करतो. ज्या चर्चा, भेटीगाठी झाल्या असतील, त्यांचा पुन्हा विचार करतो. त्यात मी स्वतःला विचारतो: “त्या वेळी मी कोणत्या शहाणपणाच्या गोष्टी केल्या ज्यांच्यामुळे माझ्यामध्ये सुधारणा झाली?’ “त्या अनुभवांवरून मी काय बोध घ्यायला हवा?’ पण या अशा साप्ताहिक पुनर्वलोकनामुळे मी अधिकच दु:खी होत होतो. How to Win Friends and Influence People PDF in Marathi मी स्वतःच केलेल्या चुकांचे मला खूप आश्चर्य वाटे.

अर्थात जसजसा काळ पुढे जात होता तसतशा चुका कमी होत गेल्या. कधीकधी मी स्वत:च माझी पाठ थोपटत असे. या प्रकारे स्वत:चे विश्लेषण करण्याची, स्वत:ला शिक्षित करण्याची पद्धत मी वर्षानुवर्षे चालू ठेवली आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या पद्धतीचा मला अधिक फायदा झाला. माझी निर्णयक्षमता वाढली, माझे इतर लोकांशी संबंध सुधारले. यापेक्षा अधिक मी काय सांगू? अशीच काहीशी पद्धत तुम्ही तुमच्या मच्या स्वत:च्या आयुष्यात का नाही वापरत? या पुस्तकातसुद्धा अशा अनेक गोष्टींची चर्चा केली आहे. जर तुम्ही अमे केले, तर दोन गोष्टी घडतील.
Click here to Download How to Win Friends and Influence People PDF in Marathi

Think and Grow Rich Marathi PDF

The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi

The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi 

Cashflow Quadrant PDF in Marathi 

एक म्हणजे तुम्ही स्वत:ला शिक्षित करण्याच्या प्रक्रियेत गुंतून जाल, जी गुस असेल व बिनखर्चाची असेल. दुसरी म्हणजे लोकांशी कसे वागावे किंवा कसे वागू नये, हे समजण्याची तुमची क्षमता बाढेल. या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला काही कोरे कागद दिसतील, ज्यांच्यावर तुम्ही ही तत्त्वे वापरून कसा विजय मिळवलात हे लिहायचे आहे. त्यात नेमकेपणा हवा. नावे, तारखा, त्याचे झालेले परिणाम हे सर्व त्यात लिहायचे आहे. अशा प्रकारे नोंद ठेवल्यामुळे पुढील काळात कधीतरी अशी वही घेऊन भूतकाळातील गोष्टींचा आढावा घेणे तुम्हाला आल्हाददायक वाटेल.

Leave a Comment