Mrutyunjay PDF Book by Shivaji Sawant | मृत्युंजय – शिवाजी सावंत

Mrutyunjay-PDF-Book

Click here to Download Mrutyunjay PDF Book by Shivaji Sawant | मृत्युंजय – शिवाजी सावंत Language Marathi having PDF Size 112.9 MB and No of Pages 329.

मी आणि माझा छोटा भाऊ शोण आमचं ते चिमुकले जग. शोण! होय शोणच! त्याचं मूळ नाव शत्रुतप होतं. पण सर्वजण त्याला शोणच म्हणत. शोण माझा धाकटा भाऊ. तसा वृकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडं विकटांच्या राज्यात निघून गेला होता. शोण आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं.

Mrutyunjay PDF Book by Shivaji Sawant | मृत्युंजय – शिवाजी सावंत

Name of Book Mrutyunjay
PDF Size 112.9 MB
No of Pages 329
Language Marathi
Buy Book From Amazon

About Book – Mrutyunjay PDF Book

चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्याभावड्या जिवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते. तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते, की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती. ते केवळ दोन भावांचं निर्हेतुक जग होतं. आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते. एक आमची आई राधा आणि आमचे बाबा- अधिरथ !

आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंत:करणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते, आणि नकळतच काहीसे कृतज्ञनेनं भारलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे दोन अश्रुबिंदू माझ्या डोळ्यांत टचकन उभे राहतात. पण हे क्षणभरच. लागलीच मी ते टिपतो. कारण मला माहीत आहे, अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते. आणि तरीही हे दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही.

Click here to Download Mrutyunjay PDF Book

कारण या दोन अश्रुबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही. आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेळ प्रेमच!

 

आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यांत काहीसे कृतज्ञतेनं भरलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रुबिंदू उभे राहतात. हस्तिनापुरातला माझा कार्यक्रम ठरल्यासारखा होता. भल्या पहाटे मी रोज उठत असे. नियमानं गंगेच्या किनाऱ्यावर जात असे. कुणाचाही त्रास नको म्हणून कधीच घाटावर जात नसे. दुसरी एक छान निवान्त अशी जागा मी माझ्यासाठी निवडली होती. तिथं कुणीच येण्याची शक्यता नव्हती.

For More PDF Book Click Below Links….!!!

Yugandhar PDF

Chhawa PDF

Yayati PDF

Durga Kavach PDF in Hindi

Hanuman Chalisa PDF

Durga Chalisa PDF

Shiv Chalisa PDF

तिथं जाऊन मी मनसोक्त डुंबत असे. नंतर कंबरभर पाण्यात येऊन उभा राही. माझ्या पायांना लहान लहान मासे येऊन लुचत. पण मला माहीत होतं की त्यांना त्यापासून काहीच खायला मिळणार नव्हतं. माझ्या अभेद्य कातडीला चावून चावून ते कंटाळत आणि शेवटी निघून जात. पुढं पुढं तर ते माझ्या आसपास फिरकेनात. माझे पाय म्हणजे पाण्यातील दोन नित्याचे खडकच आहेत असा त्यांनी समज करून घेतला असावा !

ओंजळीत पाणी घेऊन मी सूर्यदेवांची वाट पाही. दूरवर गंगेच्या पाण्यातून ते हळूच डोकावत. त्यांच्या किरणांनी, तिच्या असंख्य चिमुकल्या लहरी डोक्यावर सोनेरी वस्त्रं घेऊन नाचताहेत असं वाटे. मध्येच एखादा कारंडव पक्षी आम्हा दोघांमध्ये फेऱ्या घाली. त्याच्या इकडं तिकडं फिरण्यानं त्या तेजाची तेवढीच जागा दिसायची बंद होई. मी मनात म्हणे, ‘या एवढ्या चिमुकल्या पक्ष्यातमुद्धा काही शक्ती आहे! आपल्या अस्तित्वानं तो सूर्यबिंबालामुद्धा झाकू पाहतो आहे.

‘ तो पक्षी दूर निघून जाई. बिंब पुन्हा तळपू लागे. हातांतील पाण्याचं अर्घ्य मी त्या तेजाला देई आणि म्हणे, आपला शिष्य, हा सूतपुत्र कर्ण, आपल्या आशीर्वादाची इच्छा करतो आहे. गुरुदेव, त्याच्यावर अनुग्रह करा!’ मग एकटक मी त्या तेजाकडं पाही, चमचमणारे असंख्य तेजस्वी कण मला दिसत. प्रचंड वेगात फिरणारे तेजाचे कण ! जगातील अंधकार उजळणारे तेजाचे कण ! जगाला उत्साहाची कारंजी पुरविणारे अमर तेजाचे कण ! Mrutyunjay PDF Book

एक दिवसच जर हे कण आपलं मुख जगाला न दाखवतील तर काय होईल? हे हस्तिनापूर, हे इथले प्रासाद नि ही मंदिरं, ऐटीत छाती पुढं काढून चालणारे हे योद्धे, तो अर्जुन, तो भीम, ते द्रोण, काय होईल या सर्वांचं ? आम्ही ती निसर्गदेवतेची मनोहर रूपं पाहत आमचा प्रवास मजेत करीत होतो. रात्र पडताच जवळच्या नगरात मुक्काम करीत होतो. असे आठ दिवस गेले. अनेक नद्या आणि पर्वत ओलांडून आम्ही नवव्या दिवशी प्रयागला आलो.

प्रयाग ! इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम होता. इथून चंपानगरी आता केवळ काही योजनं दूर राहिली होती. संगमावर जावं आणि ते तीन नद्यांचं मीलन एकदा पाहून यावं म्हणून नगरात प्रवेश करताच आम्ही आमचे अश्व संगमाकडं वळविले. वेळ संध्याकाळची होती. आम्ही संगमावर आलो. मथुरेच्या बाजूनं यमुना येत होती, कांपिल्यनगराच्या बाजूनं गंगा प्रवेशत होती, अयोध्येच्या बाजूनं सरस्वती धावत होती. तिघींच्या पाण्याचे तीन वेगवेगळे ओघ स्पष्ट दिसत होते.

गंगेचं पाणी पांढर शुभ्र, यमुनेचं पाणी काळसर, तर सरस्वतीचं तांबडसर. तीन भिन्न भिन्न स्थायिभाव असूनही त्या तिघी एकमेकींच्या हातांत हात घालून सागराला मिळायला चालल्या होत्या; तेही पुढं गंगा हे एकच सुटसुटीत नाव स्वीकारून! तो त्रिकोणी संगम पाहताना माझ्या मनात एक विचित्र विचार चमकून गेला. या नद्यांना जे निसर्गानं शिकवलं ते माणसांना शिकवायला तो कसं काय विसरला ? Mrutyunjay PDF Book

माणसानं जातीचे आणि उच्चनीचतेचे खोट्या कल्पनांचे ओघ एकमेकांविरुद्ध का वळवावेत ? कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार हे ओघ ? काय निघणार आहे या भेदांच्या भगदाडांतून ? विनाशच की नाही? एकमेकांना समजावून घेऊन मानव हातांत हात घालून आपल्या सगळ्या ओघांचा एकच प्रवाह करील तर? पण ते शक्य नाही! कारण नद्या या नद्या असतात आणि माणसं ही माणसं असतात. आपल्या मूर्खपणानं आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा!

किती झंझावाती वळणं घेत आलं होतं माझं आयुष्य! काय हेतू आहे याची कळत नाही. ह्या चार तपांत तीन वेगवेगळ्या कुंतीचं जीवन मी जगले नाही काय? बालपणातील पृथा, किशोरावस्थेतील आणि तारुण्यातील कुंती, आणि आता… आता राजमाता असलेली विधवा कुंती ! पुत्रासाठी तळमळणारी कुंती ! माझी ही तिन्ही जीवनं कुणाच्या ना कुणाच्या तरी हातांत होती. बालपणी मी बाबांच्या वचनासाठी मथुरा सोडली.

तरुणपणी महाराजांच्या शापासाठी हस्तिनापूर सोडलं, आणि आता – आणि आता भावाविरुद्ध भाऊ दंड थोपटून उभा राहिलेला पाहून मी माझं जीवन काळाच्या हाती सोडलं आहे । कारण काल अर्जुन अज्ञानानं आपल्या भावाविरुद्ध उठला. भीमानंही अज्ञानानं आपल्या ज्येष्ठ भावाला, हातात कुलाला शोभणारा आसूड पे’ असा विषारी वाग्बाण मारला. पण या सर्वाधिक्षा माझ्या काळजात भीतीचा गोळा उठला आहे तो दुर्योधनाचा! Mrutyunjay PDF Book

त्यानं आपल्या पद्धती कुटिल कार आहे किती कौशल्यानं स्थानं कर्णाला आज आपल्या अधीन करवून घेतला आहे! या दुर्योधनाच्या हातांत कर्णाचं आता होणार तरी काय आहे ? मी उदास आहे ती याचकरता. या वेढ्या धात्रीला हे सगळं कसं सांगू? ती विचारते आहे, ‘महाराणी, तुम्ही उदास का ?’ कोणत्या शब्दांत तिला सांगू की मी उदास का ते? राजमाता असूरही मी माझ्या वंचित पुत्रासाठी काय करू शकते ? काही नाही.

सामर्थ्याचे आणि सत्तेचे नगरे मानव कितीही पिटत राहो, तो शेवटी काळाच्या बळकट हातातील केवळ एक नगण्य खेळ आहे. कर्म माझा पुत्र आहे.’ असं हस्तिरापुरातील एका प्रशस्त चौकात उभं राहून गा वाटतं, पण ते धैर्य मी दाखवू शकत नाही. कारण त्या धैर्याच्या प्रतिक्रियेतून माझ्या इतर पाच पुत्रांची काय अवस्था होईल ते सांगता येत नाही. कदाचित त्यांना परत वनवास भोगावा लागेल. आणि समाज मला कदाचित कर्णालाही कुरवाळू देणार नाही.

माझ्या पुत्र कर्णा, मी तुझा दोन जाग केला आहे. एकदा जन्मलास त्या वेळी, आणि परवा आखाड्यात दुर्देवी सूर्यपुत्र मी माझं जीवन काळाच्या हाती सोपविलं आहे रे. आणि तुझं जीवन तुझ्या पित्याच्या हाती सोपविलं आहे. आणि शेवटी ते अघटित खरोखरच पडलं स्वयंवराहून मी हस्तिनापुराला परत आलो ते अनेक घटनांचे अनिवार्य बाण उरात घेऊनच! आता मला वारंवार वाटतं की, आयुष्य हे एक अद्भुतरम्य स्वयंवर असावं प्रत्येक माणूस त्या स्वयंवरात हिरिरीनं भाग घेतो. Mrutyunjay PDF Book Download

पण काही वेळा काळानं इतके अवघड पण या स्वयंवरात मांडलेले असतात की ते कुणालाच सगळे जिंकता येत नाहीत. काही जणांची तर जीवघेणी दुर्दशा होते! अनेक माणसं धैर्यशाली, बुद्धिमान आणि पराक्रमी असूनही ती हे पण पूर्ण करू शकत नाहीत. मी नाही, अश्वत्थामा नाही, कर्ण नाही, कुणीच नाही. पांचालीच्या स्वयंवराच्या केवळ स्मृतींनीही माझं मन अनेकविध भावभावनांच्या विचित्र संमिश्रणानं तडफडू लागतं. काळाचे आणि देवाचे गोडवे कुणी गाइलेलं मला कधी आवडत नव्हतं.

मी जीवनात एकट्या कर्तृत्वालाच किंमत देत आलो होतो, पण जेव्हा जेव्हा कर्तृत्व थिटं पडलं तेव्हा तेव्हा मला काळाचं महत्त्व पटू लागलं. पुरुषार्थाचे कितीही नगारे मानव पिटत असो, त्याच्या कर्तृत्वाचे ध्वज हातात घेऊन तो धुंदपणानं कितीही नाचत असो, शेवटी तो विशाल नि अनंत आकाशासमोर थिटा आणि अपूर्णच राहणार. अपूर्णता हाच जीवनाचा स्थायीभाव आहे असं पांचालीच्या स्वयंवरापासून मला वारंवार बाटू लागलं आहे.

तिचं स्वयंवर पार पडलं होतं, पण तिचा सुकुमार गोंडस हात काही माझ्या हातात आला नव्हता. तिच्या पाणिग्रहणासाठी पुढं केलेल्या माझ्या भक्कम हातावर कठोर नियतीनं ठेवले होते ते धगधगीत सत्याचे जळजळीत अंगार! अजूनही स्वयंवराचा प्रसंग आठवला की माझी मती गुंग होते. जीवन हा रहस्यमय भूमार्ग आहे असंच वाटतं! मी त्या स्वयंवराला गेलो नसतो तर फारच बरं झालं असतं. Mrutyunjay PDF Book Download

त्याच्या स्फोटक गर्जनेला पणात पराभूत झालेल्या सर्वच राजांनी प्रतिसाद दिला. सर्वांनीच आपआपली शस्त्रं सावरली. मीही गदा उचलली. स्वयंवराच्या मंडपाला क्षणात सत्यासत्याच्या समरांगणाचं स्वरूप प्राप्त झालं. सर्वजण त्या ब्राह्मणकुमारावर धावले. तो हातांतील शिवधनुष्यावर असंख्य बाण चढवून ते हवे तसे सोडू लागला. सर्वजण त्याच्या दिशेनं पुढं सरकू लागले. इतक्यात एकाएकी प्रचंड झंझावातासारखा ध्वनी झाला.

दुसरा एक, भगवी छाटी घातलेला, जणू पर्वतच असा ब्राह्मणकुमार दातओठ खात सर्वांवर धावून आला. त्याला पाहताच माझं हृदय बंद पडतं की काय असंच मला वाटू लागलं. मी ज्याच्याशी सहा-सहा घटका गदा खेळलो होतो तो भीमच वस्त्रं बदलून, दाढी वाढवून तिथं आला होता! कसा आला होता तो? तो जिवंत कसा ? पुरोचनाच्या लाक्षागृहान मग जाळलं तरी काय? तागाचं आणि बल्वजाचं गवत की युवराज दुर्योधनाच्या आशाआकांक्षा ?

नेहमीच्या सवयीप्रमाणं मी माझा हात डाव्या दंडातील चांदीच्या पेटीवरून फिरविण्यासाठी उचलला आणि कुठूनतरी सूंऽ ऽ करीत आलेला एक बस्तिक वाण नेमका त्याच वेळी माझ्या दंडात घुसला !! त्याच्या पात्यानं त्या पेटीचे बंध तुटले गेले. ती पेटी उडून कुठंतरी खाली पडली ! कुणाकुणाच्या पायदळी सापडली कोण जाणे? दंडातील बाण काढावा म्हणून त्याचं शेपूट मी हातानं खेचलं. माझ्या ध्यानात राहिलं नाही की तो बस्तिक बाण होता! त्याचं पातं माझ्या दंडात तसंच राहिलं. मोडकं शेपूट हातात आलं! Mrutyunjay PDF Book Download

अपमानाच्या तीव्र तडाख्यानं आपण भ्रमिष्ट झालो आहोत म्हणून आपणाला हे विचित्र दृश्य स्वतःच्या कल्पनेतूनच दिसत असावं असं वाटून मी स्वतःला एक चिमटा काढून त्या दुसऱ्या ब्राह्मणकुमाराकडं पाहिलं. होय तो भीमच होता! त्याचे डोळे आग पाखडत होते! एखाद्या कृषिजनानं शेतातील धान्याची कणसं मळणीच्या हंगामात झोडपावीत तसा तो मिळेल त्याला हातांतील गदेच्या भक्कम प्रहारानं झोडपत होता!

त्याच्या पुढं एकटा शल्य कसाबसा टिकाव धरून होता. मद्य पाजलेल्या हत्तीसारखा तो आपल्या गदेच्या मंडलकक्षेत येणाऱ्या प्रत्येक वीराला जबरदस्त धडका देत होता. राज्य ही काही केवळ भव्य वास्तू आणि विपुल नागरिक यांवरच चालत नसतात! ती चालण्यासाठी संपत्तीची आवश्यकता असते. पांडवांनी अशी संपत्ती कधी आणि कुठून उभारली, याबाबत हस्तिनापुरातील सर्वांनाच उत्सुकता होती.

भीमार्जुनांनी आपलं राज्य समृद्ध करण्यासाठी सतत शेजारची राज्यं पादाक्रांत करण्याचा धावता विक्रम मांडला होता. पराभूत राज्यं त्यांना खंडणी देऊ लागली आणि त्यांचं इंद्रप्रस्थ संपत्र होऊ लागलं. सैन्याची संख्या वाढू लागली. आणि असाच एक दिवस पांडवांचा राजदूत अचानकपणं हस्तिनापूरला येऊन थडकला! तो. पांडवांकडून राजसूययज्ञाचं भूर्जपत्रावरचं आमंत्रण घेऊन आला होता! वासंतिक पौर्णिमला पांडव एका प्रचंड यज्ञाचा प्रारंभ करणार होते. Mrutyunjay PDF Book Download

त्या यज्ञाला पितामह भीष्मांचे शुभाशीर्वाद लाभावेत अशी त्यांची इच्छा होती. या आमंत्रणापाठोपाठ पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषीही स्वतः हस्तिनापुराला येऊन निमंत्रणाबाबत आग्रह करून गेले. स्वतः युवराज युधिष्ठिर देशोदेशी पाच सुवर्णकुंभ घेऊन फिरून आले. त्या कुंभांतून त्यांनी वितस्ता, पुरुष्णी, गंगा, यमुना, सिंधू, मंदाकिनी, अलकनंदा, इरावती, शरयू, चर्मण्वती, लोहिता अशा अनेक पवित्र नद्यांचं जल इंद्रप्रस्थात आणलं.

पांडवांच्या इंद्रप्रस्थातून राजवाड्यासमोरूनच वाहणाऱ्या इक्षुमती नदीच्या जलात हे पवित्र जल मिसळून यज्ञासाठी इक्षुमतीचं जल वापरलं जाणार होतं. इंद्रप्रस्थ इक्षुमती आणि यमुनेच्या संगमावर होतं. राजवाड्यासमोर इक्षुमतीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर भव्य पटांगणात यज्ञमंडप उभारला होता. भोवती निमंत्रितांसाठी विश्रामगृह आणि भोजनागार ही तयार ठेवण्यात आली होती. ह्या सर्व वार्ता हस्तिनापुरात येऊन थडकत होत्या,

पांडुपुत्र अर्जुन आणि भीम देशोदेशी आपल्या यज्ञाची आमंत्रण देण्यासाठी फिरू लागले होते. सर्वत्र यज्ञाचीच चर्चा सुरू झाली होती माझंही कुतूहल वाढलं. इंद्रप्रस्थ कसं काय वसविलं आहे ते एकदा तरी पाहून यावं असं मला वाटे, पण ते शक्य नव्हतं. योग्यही नव्हते! बस्स! मित्रद्रोह ठरो वा प्राण जावोत पण आपल्यासमोर हात पसरून उभ्या राहिलेल्या पांचालीच्या पवित्र प्रावरणाला स्पर्शणारा निर्दय, निष्ठुर हात खड्गाच्या एकाच फटकाऱ्यात निखंदून टाकायचा! Mrutyunjay PDF Book Free

केवळ एकाच क्षणानंतर कर्ण कुरूंच्या सभागृहातील एक सभासद राहणार नव्हता! दुर्योधनाचा प्राणाला प्राण देणारा मित्र, त्याचा मित्र राहणार नव्हता! खाली मस्तक घालून मूकपण अन्यायाला संमती देणारा विवश आश्रित राहणार नव्हता. अपमानाच्या अग्निकुंडात एकाकीपणानं होरपळणारा कोंदट सारथी राहणार नव्हता. सूडासाठी तळमळणारा सामान्य कीटक राहणार नव्हता!

केवळ एकाच क्षणानंतर आपल्या आश्रयासाठी आलेल्या एका स्त्रीचं रक्षण करणारा तो एक सूर्यशिष्य राहणार होता! एक सत्य पुरुष ठरणार होता!! मी माझ्या मनाचे सर्व धागे हळुवारपण एकत्र बांधले. धाग्यात सूतपुत्र कर्ण, कुरूंचा योद्धा कर्ण, अवमानित कर्ण, सूडांघ कर्ण सगळ्या सगळ्यांना करकचून एका आवळून मी त्यांना शरीरांच्या एका कोनाड्यात फेकून दिलं !

किरणांचे असंख्य घोडे उधळीत माझ्यातील सूर्यशिष्य कर्ण उभा ठाकला येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला एका क्षणानंतर जे घडणार होतं ते खरोखरच सर्वांना प्रचंड धक्का देणारं ठरणार होतं. विरोधासाठी कुरूंची सर्व सभा जरी आता उभी ठाकली असती तरी कुणाचाही हात कर्णापाठी उभ्या राहिलेल्या पांचालीवर पडला नसता स्त्रीदाक्षिण्याचा भोंगळ टेच त्यात असणार नव्हता! पांडवांवरच्या दयेची जाणीव त्यात आता राहणार नव्हती! स्वतःच्या पौरुषाचं प्रदर्शन तर त्यात मुळीच असणार नव्हतं! Mrutyunjay PDF Book Free

आश्रयार्थीला दिलेलं ते केवळ एक अभयदान ठरणार होतं! केवळ अभयदान! कर्णा, माझी लखा राख! म्हणून हस्तिनापुरातल्या कोणत्याही सामान्य स्त्रीनं जरी आकांतानं माझ्याकडे धाव घेतली असती तरी कधीही आणि कोणत्याही प्रसंगी मी तिला हे आणि हेच दान दिलं असतं! ही तर पांचाली होती! स्वत जीवनदान देऊनसुद्धा मी तिचं संरक्षण केलं असतं.

शांत जलाशयातून एखाद्याच सवल माशार कळपातून फुलमाया ता केवळ दुर्योधनाचा एकच भ्राता विकर्ण उठला ! हात उंचावून आपल्यापेक्षा वडील असलेल्या दुःशासनाला अधिकारवाणीनं म्हणाला, ‘दुःशामना पांचालीच्या शरीराला स्पर्शही करू नकोस! सर्वजण लक्षात ठेवा की, महाराणी तपती, नलिनी, भूमिनी दक्षिणा बीजा, देवयानी गंगा आणि सत्यवती यांनी भूषविलेली राजसभा आहे.

ही इथं राजस्त्रीवर अन्याय करणं म्हणजे मंदिरात प्रत्यक्ष आराध्य देवतेची मूर्ती पायदळी तुडविण्यासारखं आहे! जो पती स्वतः द्यूतात हरला त्याला आपली पत्नी पणावर लावण्याचा मुळीच अधिकार नाही. ज्या क्षणी तो हरला त्या क्षणी त्याचा पतित्वाचा अंत झाला. अन्यायाला पाठीशी घालणारी राजयंत्रणा, समाज वा धर्म विश्वाच्या प्रलयात टिकूच शकत नाही धुंद आणि मूढ सभासदांनो, एका रजः स्वला, एकवस्त्रा सीवर वीरांच्या सभेत चाललेला हा धडधडीत अन्याय आहे ! Mrutyunjay PDF Book Free

आपण महाराज आयू, नहुष, ययाती, पुरू, हस्ती, अजमीद, संवरण, कुरू, जन्हू, प्रतीप आणि शंतनू यांचे वंशज आहोत याची एकाला तरी आज जाणीव उरली आहे काय? सांगा, आपल्या कोणत्याही पूर्वजांच्या कारकीर्दीत कधी एवढा काळा दिवस या सभागृहान पाहिला होता काय? ज्या सभागृहात विजयाचे आणि अधमेधाचे घोडे पाठविण्याचे, हिमालयाला गवसणी घालणारे विचारविमर्श झाले.

त्याच सभागृहात आज एका अबले लज्जारक्षणासाठी फोडलेले टाहो घुमूत विरताहेत आणि तेही कुरुकुलाच्याच एका स्नुषेचे! धन्य आहे त्या कुरूंच्या राजाची आणि या यांची! ‘लहान असूनही मी वृद्ध म्हणविणाऱ्या ज्येष्ठांना स्पष्ट विचारतो की, समरांगणात तळपणारी त्यांची खड़ग आज गंजली आहेत काय ? पितामह महाराज आचार्य, गुरुदेव, अमात्य, कृपाचार्य आणि सर्वांना धर्मदान करणारे इथले तपस्वी, ब्राज, ऋषिजन अंगावर वीज पडल्यासारखे आज प्रेतवत् का बसले आहेत?

मी मागतो एका आक्रोश आणि टाहो यांचं रौद्रभैरव संगीत घेऊन वाहणारे हे जळजळीत अश्रू महापुरातल्या गंगेचं स्वरूप घेऊन जेव्हा घोंघावत धावतील तेव्हा यांतल्या ज्या आसनांच्या अभिलाषेनं तुम्ही सर्वजण अबोल आहात त्यांतील एकही आसन ठिकाणावर असणार नाही पतिव्रतेवर अन्याय म्हणजे पावित्र्यावर अन्याय ! पतिव्रतेची विटंबना म्हणजे पुरुषार्थाचा अंत! ‘सभासदांवर होतो अखं मृगाच्या मुसळधार पर्जन्यासारखा शब्दांच्या धारा वर्षवू लागला.

Leave a Comment