When Bad Things Happen to Good People PDF in Marathi by Harold Kushner

When-Bad-Things-Happen-to-Good-People-PDF-in-Marathi

Click here to Download When Bad Things Happen to Good People PDF in Marathi having PDF Size 1MB and No of Pages 80.

माझ्या मुलाला मी एक वचन दिले होते आणि ते पाळण्यासाठी खरे तर मी वीस वर्षांपूर्वी प्रस्तुतचे पुस्तक लिहिले. आयुष्याच्या अखेरीस त्याच्या मनाला एक रुखरुख लागून राहिली होती आणि ती म्हणजे, आयुष्य अल्पकालीन असल्यामुळे अवतीभोवतीचे लोक आपल्याला सहज विसरुन जातील. त्याच्या मनातील ती वेदना पाहून मी त्याला असे वचन दिले की, त्याची जीवन कहाणी मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करीन! तेच करण्याचा माझा अल्पसा प्रयत्न आहे. अरोनच्या वाट्याचे आयुष्य फारसे काही शिल्लक नव्हते.

When Bad Things Happen to Good People PDF in Marathi

Name of Book When Bad Things Happen to Good People
Author Harold Kushner
PDF Size 1 MB
No of Pages 80
Language Marathi
Buy Book From Amazon

About Book – When Bad Things Happen to Good People

त्याची शारीरिक स्थितीही सुधारण्यापलीकडे होती. हे सारे कळल्यानंतर, ह्या अन्यायी आणि दुःखांनी भरलेल्या जगात, त्या नियंत्याची भूमिका काय असेल, हे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो, ते नीटसे काळजीपूर्वक समजून घेतल्यामुळेच, माझा परमेश्वरावरचा विश्वास अधिकाधिक स्थिर होऊ लागला. मुख्य म्हणजे, हे सारे मी माझ्या धार्मिक प्रवचनांमध्ये आणि मानवी मृत्यूनंतरच्या अंतिम संस्कारप्रसंगी लोकांना स्पष्ट करुन सांगितले. अर्थात त्याचा इतरांनाही फायदा झाला.मला असे वाटले की, मला जे काही समजले आहे, ते जर मी लिहून काढले, तर त्याचा सगळ्यानाच मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. प्रस्तुतचे पुस्तक १९८१मध्ये आम्ही प्रकाशित केले. एका यहुदी धर्मगुरुने लिहिलेले आणि एका लहानशा प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेले असे हे एक ब्रह्मज्ञानाविषयीचे दीडशे पानी पुस्तक होते. सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाने जगभर खपाचा विक्रम केला. त्या पुस्तकाचे शीर्षकच, ह्या जगाची अन्यायी वृत्ती दर्शवते.

हे सगळे प्रत्यक्ष घडले आहे, यावर आज वीस वर्षे झाली तरी माझा विश्वास बसत नाही. मी बोलताना नेहमी सांगतो, तेच आत्ताही सांगतो. हे सगळे ख्रिस्ती धर्मगुरुंमुळे शक्‍य झाले. ख्रिस्ती धर्मगुरू आणि इतर पुरोहितवर्गाने त्याबद्दल प्रवचने दिली. रुग्णालयांमध्ये आणि माणसांच्या अंतिम यात्रांमध्ये ते लोकांना दिले गेले. कळतनकळत पुस्तकाचा खप वाढला. When Bad Things Happen to Good People PDF in Marathi प्रारंभी जे दुकानदार प्रस्तुतचे पुस्तक आपल्या दुकानात ठेवायला फारसे उत्सुक नव्हते, ते आता आवर्जून ते पुस्तक ठेवू लागले. पुस्तके हातोहात खपू लागली.

प्रस्तुतचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर थोड्याच दिवसांत ह्यूस्टनमध्ये त्यांच्या रेडिओवरील एका कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. मला वाटत होते की, त्यांच्या श्रोत्यांच्या विचारांपेक्षा, (धार्मिक) विश्वासापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या आणि विश्वास बाळगणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला का निमंत्रित केले गेले असेल? पण नंतर दूरध्वनीवरुन लोकांनी सांगितले की, ‘रब्बाय, परमेश्वराचे आमच्यावर प्रेम आहे, तो आम्हाला शिक्षा करीत नाही. त्याचे आमच्याकडे लक्ष आहे, याची तुम्ही आम्हाला आठवण करुन दिलीत, त्याबद्दल धन्यवाद!’ दुसऱ्या एकाने सांगितले की, “रब्बाय, मी बाप्तिस्मा देणारा धर्मगुरू आणि उपदेशक आहे.

हे पुस्तक लिहिल्याबद्दल तुमचे शतश: आभार! माझे बोलणे ऐकायला नाखूष असणारी आणि नाराजीने येणारी जी माणसे माझ्यासमोर येतात, त्यांना मी तुमचे पुस्तक देईन. त्यांच्या मनाची जेव्हा तयारी होईल, तेव्हा ती माणसे तुमचे पुस्तक वाचतील. मॅसेच्युसेट्स इथल्या रोमन कॅथॉलिक पंथाच्या एका चर्चकडून आलेले एक पत्र, मला आजवर आलेल्या हजारो पत्रांमध्ये खूप वेगळे वाटले. त्यांनी लिहिले की, “तुमची सारीच धार्मिक अवतरणे आम्हाला पटली, आवडली नसली, तरी त्यातून व्यथित माणसाचे दुःख निश्चितपणे हलके होते. दर आठवड्याला आम्ही, तुमच्या पुस्तकाच्या किमान पाच प्रती तरी वाटतो.’ पत्राचा शेवट त्यांनी असा केला होता :

The Alchemist PDF In Marathi

Rich Dad Poor Dad Marathi PDF

The Power of Habit Marathi PDF Book

The 5 Am Club PDF In Marathi

Think and Grow Rich Marathi PDF

त्या माणसांच्या वेदना-दुःखे हलकी झाली की त्यांचे विचार आम्ही बदलू!’ माझ्या पुस्तकातल्या दोन ओळी माझ्याकडे बऱ्याच वेळा लिहून पाठवल्या जातात. त्यातली एक माझी स्वतःचीच खूप आवडती आहे. ती ओळ मी लिहिलेली नाही, तर १९व्या शतकातल्या रीमानोव्ह इथल्या या यहुदी रब्बायचे वचन मी उद्धृत केलेले आहे. ते वचन असे आहे की, ‘माणसे हीच परमेश्वराची भाषा आहे. ‘ म्हणजे दुःखातिरेकाने देवाचे नाव घेत घेत आपण शोक करतो, तेव्हा देव आपल्याकडे माणसांना पाठवतो. डॉक्टर आणि नर्सेस आपल्याला बरे करण्यासाठी अथकपणे काम करीत असतात. मित्र आपल्याजवळ येऊन बसतात.

काहीही न बोलता, ते आपले हात हातात घेतात. ते आपल्याला कोणतेही प्रवचन ऐकवत नाहीत किंवा इतरांचे दु:ख आपल्या दुःखापेक्षा कसे आणि किती खोल आहे, हे सांगत नाहीत. When Bad Things Happen to Good People PDF in Marathi मुख्य म्हणजे, आपल्याला जरी नीटसे कळलेले नसले तरी – आपण एकटे पडलेलो नाही, आपली काळजी घेतली जावी, इतकी आपली निश्चित लायकी आहे – अशी खात्री वाटण्याची त्या क्षणी आपल्याला आवश्यकता असते. १९९५च्या जून महिन्यात ओक्लाहोमा शहरातल्या सरकारी इमारतीवर बॉम्ब हल्ला झाल्यानंतर सहा आठवड्यांनी मला तिथे एक कार्यशाळा घेण्यासाठी निमंत्रित केले गेले.

ही कार्यशाळा त्या हल्ल्यातील जखमी व त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या समुपदेशनाचे काम करणारे चर्चमधील फादर, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी होती. तेथील गव्हर्नरच्या हवेलीत येऊन राहिलेल्या कुटुंबीयांशी मी बोलावे, असे मला सांगण्यात आले. तुम्हाला कदाचित आठवत असेल की, अतिरेक्यांच्या त्या हल्ल्यात जखमी झालेले लोक हे समाजातील विविध थरातील होते. तरुण आणि वृद्ध, श्रीमंत आणि गरीब, अफ्रिकन आणि अमेरिकन, लॅटिन अमेरिकन आणि गोरे, हॉर्वर्डमधील कायद्याचे पदवीधर आणि सरकारी मदतीवर जगणारे लोक असे अनेक प्रकारचे लोक तिथे होते.

त्यांना भेटल्यावर प्रत्येकाला मी विचारले की, ‘गेले सहा आठवडे तुम्ही कसे राहू शकलात? तुम्हाला ह्या संकटातून सावरण्यासाठी उपयोगी पडलेली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती?” When Bad Things Happen to Good People PDF in Marathi आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, सगळ्यांनी मला एकच उत्तर दिले : आपला समाज, अचानक मदतीला धावून आलेले लोक, शेजारीपाजारी, चर्चमधले लोक, आम्हाला जबळ घेऊन आमची विचारपूस करणरे आणि आमचे सांत्वन करणारे असंख्य अनोळखी लोक यांच्यामुळे आम्ही सावरलो.

एक लक्षात घ्या की, संकटात सापडलेल्या माणसाला, इतर कोणत्याही स्पष्टीकरणापेक्षा किंवा प्रवचनापेक्षा सांत्वनाची सर्वाधिक गरज असते. नियतीने एकट्याला गाठून केलेल्या त्या आघातातून सावरण्यासाठी, त्या व्यक्तीला हे पटवून देण्याची वा सांगण्याची गरज असते की, तो/ती एक चांगलीच व्यक्ती आहे आणि जे काही झाले ते त्याच्या/ तिच्या बाबतीत होणे योग्य नव्हते. विस्कॉन्सिन विद्यापीठात दुःख-वेदनांची प्रभाव परिणामकारकता अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या एका केंद्राने काही प्रयोग केले होते.

सुदैवाने ते माझ्या वाचनात आले. बर्फाच्या पाण्यात उघडा पाय किती वेळ ठेवता येतो, याचा अभ्यास त्यांनी काही स्वयंसेवकाबाबत केलेल्या प्रयोगात केला. त्या अभ्यासात त्यांना असे आढळले की, हा प्रयोग करताना त्या खोलीत आणखी कोणी व्यक्ती असली, तर त्या थंड पाण्यात दुप्पट वेळ व्यक्ती पाय ठेवून बसते. When Bad Things Happen to Good People PDF in Marathi आपल्याविषयी काळजी असणारी व्यक्ती जवळ असल्यास ती व्यक्ती दुप्पट दुःख सहन करू शकते. आपण दुःखात असताना आपल्याकडे माणूस पाठवून परमेश्वर हेच तर साधत असतो. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणातील एक परिच्छेद काही लोकांना खूप आवडला.

मी त्यात लिहिले होते की, ‘अरोनच्या मृत्यूमुळे मी अधिकाधिक संवेदनशील व्यक्ती झालो. आता एक धर्मगुरू म्हणून माझा खूप प्रभाव पडतो. इतकेच नव्हे तर एक समुपदेशक म्हणून अधिक सहानुभूतीने मी समोरच्या व्यक्तीला समजून घेऊ शकतो. माझा मुलगा मला जर परत मिळणार असेल, तर हे सारे मी एका क्षणात सोडून देईन. इतर दुःखी आईबाप व स्त्रीपुरुष यांना, त्यांच्यावर ओढवलेल्या अत्यंत कठिण प्रसंगात अधिक मानसिक ताकद, आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली.

सर्वात महत्वाचे म्हणजे, करुणेचा स्पर्श त्यांच्या जीवनाला झाला, त्यांनी मला सांगितले की त्यांच्याही मनात अशाच भावना आहेत, पण अर्थात आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नाही. आपण फक्त येणाऱ्या प्रसंगाशी जुळवून घेऊ शकतो. When Bad Things Happen to Good People PDF in Marathi आपल्यापैकी प्रत्येकजण दुःख, शोक, दुर्दैव यांच्या बाबतीत एवढेच करू शकतो. त्या सगळ्याचे आपण स्पष्टीकरण देत बसत नाही. आपण स्वतःला असे समजावत नाही की, शेवटी आपल्याला हे मिळणे योग्यच होते. आपण त्याचा स्वीकारही करत नाही. फक्त त्यातून पार पडण्याचा प्रयत्न करतो.

आपण त्यातला कठोरपणा समजून घेतो आणि निर्धाराने प्रयत्न करुन टिकून रहात कसे तरी जगत राहतो. आताच्या दुःखी पालकांना मी हे सांगू इच्छितो की, अकाली हे जग सोडून गेलेल्या तुमच्या मुलाची पुस्तके, खेळणी, इतर वस्तू तुम्हाला मिळाल्या, तसेच तुमच्या मुलाला जेवढे आयुष्य जगायला मिळाले नाही, ते तुम्हाला मिळाले आहे. ती वर्षे म्हणजे त्या बाळाकडून तुम्हाला मिळालेला वारसा आहे. त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करा. आयुष्याचा आनंद घेताना तुमचे प्रेमाचे माणूस तुमच्याबरोबर नाही म्हणून अपराधी भावना मनात ठेवू नका. तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने व्यतीत करा आणि पुढे निघून गेलेले तुमचे प्रेमाचे माणूस तुमच्याबरोबर आहे, अशी भावना मनात ठेवा.Click here to Download When Bad Things Happen to Good People PDF in Marathi

The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi

The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi 

Cashflow Quadrant PDF in Marathi 

How to Win Friends and Influence People PDF in Marathi

बीस वर्षापूर्वी मी लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाने माझे आयुष्य बदललेच, पण त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे इतरही लाखो लोकांची आयुष्ये बदलली. त्या पुस्तकामुळे धर्मावर श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या किंवा इतरांच्या दुर्दैवाबद्दल विचार करण्याच्या पद्धतीतही काहीसा बदल घडून आला. मी जर हेच पुस्तक आज पुन्हा लिहायला घेतले, तर असेच लिहीन का? अर्थात इतर वाचकानी मला सांगितलेल्या गोष्टींची, सूचनांची मी त्यात भर घालीन. गेल्या वीस वर्षात आलेल्या अनुभवांतून मी हे शिकलो आहे की, माझ्या बोलण्याने लोकांच्या जखमा बऱ्या होतात आणि तुटलेली हृदये सांधली जातात. माझे बोलणे तत्त्वज्ञानाच्या किंवा धर्मशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे की नाही, हे मला ठामपणे सांगता येणार नाही. तरीही माझा असा विश्वास आहे की, मी जे सांगतो ते बरोबर असावे. एक गोष्ट मला माहिती आहे की माझ्या बोलण्याने लोकांच्या मनाला शांतता लाभते आणि ते परमेश्वराकडे वळतात. हे सत्यमाझ्यादृष्टीनेपुरसेआहे.

Leave a Comment