Yayati PDF Book by V.S. Khandekar | ययाति – वि. स. खांडेकर

Yayati-PDF-Book

Click here to Download Yayati PDF Book by V.S. Khandekar | ययाति – वि. स. खांडेकर Language Marathi having PDF Size 2.8 MB and No of Pages 251.

‘एका महर्षीच्या दर्शनाला. लग्न होऊन अनेक वर्षं झाली, तरी मला मूल होईना. म्हणून आम्ही दोघं त्या ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिलो होतो. त्यांच्या आशीर्वादानंच यति झाला मला. प्रत्येक वर्षी त्याच्या वाढदिवशी मी त्याला त्या ऋषींच्या दर्शनाला घेऊन जात असे. तो निघून गेला, तेव्हा मी अशीच परत येत होते. यतीचं मन स्थिर नाही, हे मला ठाऊक होतं. तिथंच राहायचा हट्ट धरून बसला होता तो. त्यामुळं मी त्याच्यावर संतापले. त्याला नाही नाही ते बोलले.

Yayati PDF Book by V.S. Khandekar | ययाति – वि. स. खांडेकर

Name of Book Yayati
PDF Size 2.8 MB
No of Pages 251
Language Marathi
Buy Book From Amazon

About Book – Yayati PDF Book

वांड खोंडाला गाडीच्या मागं बांधून नेतात ना? तसंच जवळजवळ आश्रमातून ओढून आणलं मी त्याला. त्याच्या रुसव्याफुगव्यांकडं मी लक्ष दिलं नाही. त्याला काय हवं होतं?” ‘काय हवं होतं यतीला?’ मी उत्सुकतेने मध्येच प्रश्न केला. टपटप टिपे गाळीत ती म्हणाली, ‘अजूनही मला नीट कळलं नाही ते. त्याला देवाधर्माचा नाद फार होता. दासी ताजी, टपोरी फुलं प्रत्येक दिवशी सकाळी पुढं आणून ठेवीत. पण यतीनं झटून त्यांतली काही उचलली नि त्यांचा पोटभर वास घेतला, असं कधी घडलं नाही.

केव्हा तरी चार-दोन फुलं तो हळू घ्यायचा आणि कुठल्या तरी दगडाचा देव करून त्याला ती वाहायचा! तो खेळ खेळायचा, तेसुद्धा किती विचित्र होते! समाधी लावून डोळे मिटून बसण्यात, किंवा कसली तरी दाढी लावून लुटूपुटीचा ऋषी होण्यात त्याला आनंद वाटे. दोन्ही कुळांतलं राजेपण त्याच्या रक्तात उतरलं नव्हतं. राजसभेत सशासारखा तो चोहींकडं भीत भीत पाहत राही. पण कुणी योगी, तपस्वी, संन्यासी राजवाड्यात आला, की त्याच्याशी मात्र त्याची गट्टी होई.

Click here to Download Yayati PDF Book

खूप खूप शोध केला आम्ही त्याचा; पण आभाळातून गळून पडलेली चांदणी कधी कुणाला दिसते का? माझा यतीही तसाच ‘ माझ्या जन्मापूर्वीचे आपले हे दुःख आई शक्य तितक्या शांतपणाने मला सांगत होती. पण शेवटच्या क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला. ‘माझा यतीही तसाच ‘ हे शब्द तोंडातून बाहेर पडताच घनदाट अरण्यातली ती ‘क्रूर पहाट तिच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली असावी. बोलता-बोलता ती अडखळली, थांबली. कापू लागली.

करुण स्वर आळविणाऱ्या सतारीची तार एकदम तुटावी, तसा भास झाला मला! क्षणभर तिने माझ्याकडे शून्य दृष्टीने पाहिले. त्या दृष्टीचे भय वाटले मला. लगेच तिने एका मोठा सुस्कारा सोडला आणि मला पोटाशी धरून ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तिचे सांत्वन कसे करायचे, ते मला कळेना. नगरदेवतांचा वार्षिक उत्सव जवळ आला. या उत्सवाला दूरदूरच्या नगरांतून आणि खेड्यांतून लोकांचे लोंढेच्या लोंढे येत. नदीसारख्या असलेल्या हस्तिनापुराला त्या वेळी समुद्राचे स्वरूप प्राप्त होई.

Durga Kavach PDF in Hindi

Marathi Vyakaran PDF

Hanuman Chalisa PDF

Durga Chalisa PDF

Shiv Chalisa PDF

Aditya Hridaya Stotra PDF

Sundar Kand PDF

Ganesh Chalisa PDF

कथा-कीर्तने, पुराणे प्रवचने, भजन-पूजन, नृत्यसंगीत, स्त्री-पुरुषांचे विविध खेळ, नाना प्रकारची सोंगे, नाटके यांच्या नादात ते दहा दिवस दहा पळांसारखे निघून जात. या वर्षाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या खेळात सेनापतींनी एका नव्या क्रीडेचा समावेश केला होता. साहसी सैनिकांच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच त्यांनी ही कल्पना काढली असावी.

वेगाने धावणाऱ्या घोड्याला मद्य पाजून विशाल वर्तुळाकार रिंगणात मोकळे सोडून द्यायचे, तो चौखूर धावू लागल्यावर स्पर्धकाने मिळेल तिथे त्याला गाठून त्याच्यावर मांड ठोकायची आणि त्या प्रांगणात पाच फेऱ्या घालून, त्याला न थांबवता, खाली उतरायचे. प्रत्येक वेळी नवा तेजस्वी घोडा क्रीडेकरता आणायचा. हा खेळ मला फार आवडला; पण तो सर्वसामान्य सैनिकांसाठी होता. त्यात युवराजाने भाग घेणे कुणालाच रुचण्यासारखे नव्हते.

या उन्मादक क्रीडेच्या वेळी मी अतृप्त मनाने, पण उत्सुक डोळ्यांनी बाबा आणि आई यांच्यापाशी बसलो होतो. चार घोडे आले आणि पाचवी फेरी पुरी व्हायच्या आतच एखादा चेंडू फेकावा, तसे वरच्या वीराला फेकून देऊन ते निघून गेले. पाचवा घोडा प्रांगणात येत असताना मी त्याच्याकडे पाहिले. तो एखाद्या भव्य, रेखीव राक्षसासारखा दिसत होता. त्याचे लाल लाल डोळे, फेंदारलेल्या नाकपुड्या, देहाच्या मोहक पण उन्मत्त हालचाली यांनी सभोवार पसरलेल्या जनसमुद्रात कुतूहलाच्या लाटा उसळल्या.

प्रत्येकाच्या डोळ्यांत भीती, आश्चर्य आणि उत्सुकता यांचे मिश्रण दिसू लागले. सहा सेवक त्याला बांधून क्रीडांगणात आणीत होते; पण त्यांना न जुमानता तो मोठमोठ्याने खिंकाळत होता. जोरजोराने टापा आपटून खुरांनी माती उकरीत होता. त्वेषाने मान उडवून मी तुमच्या इच्छेप्रमाणं चालणार नाही’ असे म्हणत होता. त्याने मान उडविली, की त्याची आयाळ विसकटून जाई. मग ती मोठी विचित्र दिसे. शाप द्यायला सिद्ध झालेल्या एखाद्या क्रुद्ध ऋषीच्या पिंजारलेल्या जटांसारखी ती भासे. Yayati PDF Book

त्याच्याकडे पाहता-पाहता माझे मन अभूतपूर्व उन्मादाने भरून गेले. माझे हात फुरफुरू लागले. माझी पावले जमिनीवर जोराने आघात करू लागली. शरीरातला कण नि कण थुई थुई नाचणाऱ्या कारंजाच्या पाण्यासारखा उसळ्या मारू लागला. ‘युवराज, आपल्या पाठोपाठ मलाही आश्रम सोडून जावं लागत आहे. आपण सर्वांनी मिळून शांतियज्ञ पार पांडला; पण त्या यज्ञाच्या पवित्र कुंडातल्या अग्रीचं विधिपूर्वक विसर्जन होण्याच्या आधीच देव-दैत्यांच्या युद्धाचा वणवा भडकला आहे।

दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्या संपादन केल्याचं इथं आपण ऐकलंच होतं. त्या विद्येच्या बळावर रणांगणात मारल्या जाणाऱ्या राक्षस सैनिकांना ते पुनःपुन्हा जिवंत करीत आहेत. आपला पराभव आता अटळ आहे, या भावनेने देव हताश होऊन गेले आहेत. काय करावे, कुणालाच कळत नाही. युद्ध- ते दोन व्यक्तींतलं असो, दोन जातींतलं असो अथवा दोन शक्तीतलं असो- मला नेहमीच निंद्य आणि निषेधार्ह वाटत आलं आहे.

आदिशक्तीनं निर्माण केलेलं हे सुंदर विश्व किती विशाल आणि संपन्न आहे! त्यात प्रत्येकाला जगता येणार नाही का? माझ्यासारख्या वेड्यांचं हे स्वप्न कधी काळी खरं होणार आहे, की नाही, कुणाला ठाऊक! आज तरी हा विचार म्हणजे केवळ स्वप्ररंजन आहे! या युद्धात देवांचा पराभव होणार, हे उघड दिसत आहे. पण आपल्या ज्ञातीचा पराजय उघड्या डोळ्यांनी पाहणं किती कठीण आहे! तो टाळण्याकरिता काही तरी करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं मला वाटू लागलं. Yayati PDF Book

सारी रात्र पर्णकुटीपुढल्या अंगणात मी येरझारा घालीत होतो. आकाशात नक्षत्रं चमकत होती. पण माझ्या मनात अंधार भरला होता. या अस्वस्थ मनःस्थितीत मला आपली किती आठवण झाली, म्हणून सांगू? शेवटी पहाटे एक कल्पना सुचली. छे! स्फुरली! कवीला काव्य कसं सुचतं, याचा अनुभव मी घेतला. देवपक्षाला संजीवनी विद्या मिळेल, तरच त्याचा पराभव टळेल. पण ती विद्या त्रिभुवनात केवळ शुक्राचार्याना अवगत आहे! कुणी तरी शिष्य म्हणून त्यांच्याकडे जायला हवं.

ती विद्या हस्तगत करायला हवी. देवांपैकी कुणी हे साहस करील, असं वाटत नाही. म्हणून मीच वृषापर्व्याच्या राज्यात जाऊन या विद्येसाठी शुक्राचार्यांचा शिष्य होण्याचं ठरवलं आहे. तिथं काय पडेल, हे कसं सांगू? कदाचित माझा हेतू सफल होईल. कदाचित ध्येयसिद्धीच्या कामी मला माझे प्राण अर्पण करावे लागतील! अंगिरसमहर्षीनी- ते आमच्याच कुळातील आहेत, हे मी आपल्याला सांगितलं होतं का?- या कल्पनेला आशीर्वाद दिला आहे.

तो देताना ते सहज मला म्हणाले, ‘तू जन्मानं ब्राह्मण आहेस. अध्ययन, अध्यापन, यजनयाजन हा तुझा धर्म. तू विद्या मिळवायला चालला आहेस हे खरं. पण तुझं हे साहस ब्राह्मणापेक्षा क्षत्रियालाच शोभणारे आहे.’ मी उद्गारलो, ‘युवराज ययाति इथं असते, तर त्यांना बरोबर घेऊनच मी राक्षसांच्या राज्यात पाऊल टाकलं असतं. शौर्याचं काम मी त्यांच्याकडं सोपवलं असतं आणि विद्यासंपादनाचं काम माझ्याकडं घेतलं असतं. Yayati PDF Book Download

‘अंगिरसांना मी बोलून दाखविलं नाही, पण त्यांच्या उद्गारांमुळे माझ्या मनात एक नवा विचार निर्माण झाला. प्रत्येक वर्णाने इतर वर्णांचे गुण आत्मसात करण्यात कोणती हानी आहे! माझी मृत्यूची भीती खोटी? मग जगण्यात मला वाटणारा आनंदही खोटा असला पाहिजे। काल रात्री मुकुलिकेच्या बाहुपाशात मी लुटलेला आनंदही खोटा आणि आज सकाळी ते पाप होते, या कल्पनेने मनाला लागलेली टोचणीही खोटी! देव खोटे, दैत्य खोटे!

मग देवदानवांच्या युद्धाकरिता अंगिरस ऋषींनी शांतियज्ञाचा खटाटोप का केला? कच संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी एवढे साहस करायला का प्रवृत्त झाला? दृष्टीला पडणारे हे चराचर जग आणि मनाला येणारे सुख-दुःखांचे सारे अनुभव ही जर केवळ माया असेल, हा जर क्षणिक भास असेल, तर नहुषमहाराजांचा निश्चेष्ट देह पाहून माझे मन व्याकूळ का होते? शरीर भंगुर असेल, पण ते खोटे नाही.

खाचे सुखदुः उत्कट अनुभव कालांतराने पुसट होत असतील; पण ते खोटे नाहीत. भूक असत्य नाही आणि तिचे दुःखही असत्य नाही. पंचपात्रे असत्य नाहीत आणि त्यांचे सुखी असत्य नाही. पंडितांनी अनेक पोथ्यांतले लोक मला वाचून दाखविले, त्यांचे सुरस विवरण केले. पण त्या साऱ्या महापुरात मी कोरडाच राहिलो! पाप, पुण्य, प्रेम, वासना-मला अस्वस्थ करून सोडणारे असे कितीतरी प्रश्न त्यांना विचारायला मी आलो होतो, पण ते विचारण्यात काय अर्थ होता? Yayati PDF Book Download

माधवाने अतिशय आग्रह केला, त्याचे मन मोडू नये, म्हणून दुपारचे भोजन त्याच्याकडेच करावे आणि त्याच्याशी चार घटका गोष्टी करून मग राजवाड्यावर जावे, असे मी ठरवले. माधवाच्या थोरल्या भावाला काव्याचा नाद होता. लहानपणी त्याचे नाव अनेकदा ऐकले होते मी. तो कुठे आहे. म्हणून मी त्याला सहज विचारले. पतीच्या मृत्युमुळे त्याचे मन संसारातून उडाले तो तीर्थयात्रा करीत फिरत असतो, असे माधवाने मला सांगितले.

पंडितमहाशयांचे मघाचे तत्त्वज्ञान माणसाच्या खऱ्याखुऱ्या अनुभवांपासून लक्ष योजने दूर आहे, याविषयी मी निःशंक झालो. माधवाच्या घरी जात असताना आपला भाऊ प्रसिद्ध कवी कसा झाला, ती कथा त्याने मला सांगितली. राजधानीत एक काव्यस्पर्धा चालली होती. तिच्यात भाग घेण्याकरिता लांबून निरनिराळ्या प्रदेशांतून अनेक कवी आले होते. त्यांच्या मानाने माधवाचा भाऊ अप्रसिद्ध होता. ‘चंद्रावरचा कलंक’ या विषयावर समयस्फूर्त काव्य करण्याची स्पर्धा सुरू झाली.

माधवाच्या भावाने तिच्यात प्रथम भाग घेतला नाही. कमळातला भुंगा. हिमालयावरला काळा खडक, अशा काही कल्पना करून अनेक कवींनी आपले लोक म्हटले. शेवटी पंचनदातल्या एका कवीने चंद्राची सुंदर तरुणीच्या स्तनाशी व कलंकाची त्याच्या कृष्ण अग्राशी तुलना केली. त्या उच्छृंखल, पण शृंगारिक कल्पनाविलासाने श्रोते मोहून आणि वाहून गेले पारितोषिक या कवीलाच मिळणार, असे सर्वांना वाटू लागले. रमराज शृंगाराचा तो विजय होता. Yayati PDF Book Free

‘स्पर्धेत भाग न घेतलेल्या कुणा कवीला तो आता घ्यायचा असेल, तर त्यानं पुढं यावं!” असे परीक्षकांनी सुचविले. कचाने भेट म्हणून देवयानीला दिलेले हे पट्टांशुक। ते चुकून- बाबांच्या पायांशपथ चुकून- मी नेसले या विलक्षण योगायोगात देवाचा काही हेतू असेल काय? संजीवनीसाठी कच इथ आला. तो आमचा शत्रु होता; पण त्याची विद्या, त्याची निष्ठा, त्याचा त्याग, त्याचा स्वभाव या सर्वामुळे मनातल्या मनात मी त्याची पूजा करू लागले.

असला वडीलभाऊ मला लाभला असता, तर मी किती किती चांगली झाली असते, असे अनेकदा माझ्या मनात येई. देवयानीने मला त्याच्याशी कधी मोकळेपणाने बोलू दिले नाही, वागू दिले नाही! तिला माझा कसला मत्सर वाटत होता, कुणास ठाऊक! पण कचाकडे नुसते पाहिले, तरी माझे मन प्रसन्न होई. त्याने माझ्याकडे पाहून मंद स्मित केले, तरी मनाला मोठा आनंद वाटे. सहज संभाषणात तो असे काही बोले, की पुढे किती तरी दिवस मी त्याचा विचार करीत राही.

राक्षसांनी त्याला तीनदा हालहाल करून मारले. पण प्रत्येक वेळी जिवंत झाल्यावर तो हसून मला म्हणाला, “एखादी गोष्ट दुरून जितकी भयंकर दिसते, तितकी ती खरोखर भीतिदायक नसते मरणसुद्धा असंच आहे. राजकन्ये, अनुभवाचे बोल आहेत हे माझे!’ एवढे बोलून तो किती मोकळ्या मनाने हसायचा! त्याच्या या उद्गारांचा अर्थ काय? कचाला भविष्य कळत होते काय? दासीपण म्हणजे दुसरे काय आहे? मरण- माणसाच्या अभिमानाचे मरण! त्याच्या मोठेपणाचे मरण! Yayati PDF Book Free

राजकुलात माझा जन्म झाला, म्हणून दासी होणं भयंकर वाटतंय मला! पण मी एखाद्या दासीच्या पोटी। जन्माला आले असते, तर मी आनंदाने माझे जीवन कंठीत राहिले असतेच. की नाही? जगातच सात्याच मुली काही राजकन्या म्हणून जन्माला येत नाहीत! आणि गुणावगुण काय जातीवर अवलंबून असतात? कच ब्राह्मण, देवयानी ब्राह्मण पण तिच्या स्वभावात त्याचा एक तरी गुण उतरला आहे का? छे! या जगात जन्मावर, जातीवर काही अवलंबून नाही. राजकन्या दुष्ट असू शकेल, दासी सज्जन असू शकेल!

ब्राह्मण असलेल्या कचाने दानवांच्या नगरीत संजीवनीसाठी येण्याचे केवढे धैर्य प्रगट केले| साया क्षत्रियांना त्याने लाजविले. दानवांनी त्याचा पुन्हा-पुन्हा वध केला. पण तो भ्याला नाही. डगमगला नाही, पळून गेला नाही. संजीवनी पदरात पडेपर्यंत तो निर्भयपणे इथे राहिला. हे वस्त्र- कचाने नकळत मला दिलेली भेट आहे ही! ही जन्मभर जपून ठेवायला हवी! कचाची आठवणच मला या संकटातून

संकटे कुणाला चुकली आहेत! उलट, या जगात मी सज्जनांच्याच वाट्याला अधिक येतात. कच एवढा सालस, एवढा प्रेमळ, एवढा निःस्वार्थी, एवढा बुद्धिमान असे असून त्याला काय कमी दुःख भोगावे लागले? पण देवयानीने शाप दिल्यानंतर माझा निरोप घेण्याकरिता कच आला, तोसुद्धा हसतमुखाने! प्रेमभंगाचे दुःख, प्रेयसीने आप दिल्याचे दुःख, पण त्याच्या मुद्रेवर कसल्याही दुःखाची छायासुद्धा नव्हती Yayati PDF Book Free

मलाच राहवेना! मी त्याला म्हणाले, ‘लग्न होऊन तुम्ही देवलोकी जायला निघाला असता, तर तुम्हांला मी मोठ्या आनंदाने निरोप दिला असता! | तो शांतपणे म्हणाला, ‘तुझे क्षेमकुशल कळून आनंद झाला. आता तपश्चर्येला बसायला मी मोकळा झालो. नातवाचं तोंड पाहून मग पुरश्चरणाला प्रारंभ करावा, असं माझ्या मनात अनेकदा आलं! नाही, असं नाही; पण

तू गेल्यावर आश्रम कसा खायला येतोय मला! इयं मनोभावानं माझी सेवा करणारे शिष्य आहेत. डोळ्यांत तेल घालून माझी काळजी करणारा वृषपर्वा आहे. बाह्यतः सर्व दृष्टींनी मी सुखी आहे. मला काही काही कमी नाही. पण काही तरी कमी आहे. अशी हुरहूर मात्र मनाला एकसारखी वाटते. सासरी जाणान्या कन्येच्या प्रत्येक पित्याची अशीच अवस्था होते काय, कुणाला ठाऊका तू माझी एकुलती एक मुलगी आहेस.

कदाचित त्यामुळं मी असा अस्वस्थ होत असेन! पण तुझ्या आवडत्या कुंजातली वेल फुललेली पाहून मनात येतं, देवयानी इथं असती, तर किती तत्परतेनं ही फुलं माझ्या पूजेसाठी तिनं खुडली असती! तू माझ्याकरिता मुद्दाम तयार करून घेतलेल्या मृगाजिनावर बसलो, म्हणजे मला थोडं बरं वाटतं. तुझे पैंजण इथंच आश्रमातल्या कोपयात पडून राहिले आहेत. कुणी तरी शिष्यानं झाडलोट करताना ते इकडून तिकड ठेवले, की क्षणभर ते छुमछुमतात. Yayati PDF Book Free

मग माझ्या मनात येतं. ते मला हळूच विचारताहेत, ‘आमची धनीण केव्हा येणार?” अशा मनःस्थितीत कालक्षेप करीत राहण्यापेक्षा तपश्चर्येला बसावं, असं माझ्या मनानं घेतलं आहे. संजीवनी विद्येचं संरक्षण माझ्या हातून व्हावं तसं झालं नाही, म्हणून माझ्यावर भगवान शंकर कोपले असतील. कदाचित पूर्वीपेक्षा अधिक उग्र तप करावं लागेल! पण तुझा पिता एखादी अपूर्व विद्या संपादन केल्याशिवाय आपल्या तपश्चर्येची सांगता करणार नाही, याबद्दल तू निति ऐस

आपल्या पित्यानं उगीच हा देहदंड करून घेऊ नये, असं तुझ्या मनात येईल; पण, देवयानी, हे जग शक्तीचं आहे. अशी अपूर्व शक्ती मी मिळविली होती. माझ्या दुर्दैवानं दुर्दैवानं कसली? दारूच्या आमतीपायी- ती मी गमावली! पण अशी एखादी अलौकिक शक्ती संपादन करून जगावर स्वामित्व गाजवीत मानानं जगणं निराळं आणि कुठलीही शक्ती जवळ नसल्यामुळे दुर्वनाचं आणि प्रवाहपतिताचं क्षुद्र आयुष्य कंठ निराळं पहिलं खरं जीवन आहे.

दुसरं जिवंतपणीच माणसाला येणारं मरण आहे! मृत्यूनंतर आदिशक्तीनं मला आकाशात जागा द्यायचं ठरविलं, तर मी तिला म्हणेन, ‘इतर सर्व ग्रहांपेक्षा अधिक तेजःपुंज स्वरूपात तू मला इथं ठेवणार असशील, तरच मी गगनमंडळात राहीन. तसं होणार नसेल, तर कुठल्या तरी मिणमिणणाऱ्या ताऱ्याच्या रूपानं तिथं राहायची माझी इच्छा नाही. त्यापेक्षा मी पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ पाषाण होईन.’

Leave a Comment