Yugandhar PDF Book by Shivaji Sawant | युगंधर – शिवाजी सावंत

Yugandhar-PDF-Book

Click here to Download Yugandhar PDF Book by Shivaji Sawant | युगंधर – शिवाजी सावंत Language Marathi having PDF Size 6.8 MB and No of Pages 702.

काय करून ठेवलंय गेल्या हजारो वर्षांत माझ्या जीवनचरित्राचं सर्वांनी माझ्या निस्सीम भक्तांनी तसंच कडव्या विरोधकांनीही कुठून कुठवर आणून ठेवलंय मला! भावड्या भक्तांनी त्यांच्या सोईन माझा ‘देव’ केला, तर विरोधकांनी ‘कृष्ण कारस्थानी,, ‘कपटी’ अशी निवडक उपाधी मला देऊन हात झटकले. मला कुटिल कारस्थानी ठरविल! यासाठीच माझ्या जीवनाच्या स्वच्छ नीलवर्णी सरोवरावर हजारो वर्ष दाट दाटलेल सर्व शेवाळ आज माझे मलाच निर्धाराने दूर करायचं आहे.

Yugandhar PDF Book by Shivaji Sawant | युगंधर – शिवाजी सावंत

Name of Book Yugandhar
PDF Size 6.8 MB
No of Pages 702
Language Marathi
Buy Book From Amazon

About Book – Yugandhar PDF Book 

केवळ माझ्याच आंतरिक समाधानासाठी. म्हणूनच तुम्ही पिढयानपिढ्या वाचलेल, तोंडपाठ केलेल, पारंपरिक पोथीनिष्ठ श्रीकृष्ण चरित्र’ मी मुळीच सांगणार नाही! आज या क्षणी माझं जस घडल तसे चरित्र सांगितल्याविना मूकच राहणंही माझ्या हातात नाही. फार तर काय होईल? एखादी नगण्य घटना पूर्णतः दूर राहील. घटनांचा क्रमही कुठतरी मार्ग पुढं होईल.. एखादा छोटासा संदर्भ समूळ निसटेलही. त्यामुळे खरोखरच फारसे काही बिघडत नाही.

आज या क्षणी मी पहुडलो आहे, तो सौराष्ट्रातील ‘भालका तीर्था” वरील एका फांद्याच फांद्या असलेल्या, डेरेदार प्राचीन अश्वत्थ वृक्षाच्या तळी. का आलो मी इथे? माझ्या अत्यंत प्रिय मेघपुष्प, बलाहक, शैव्य आणि सुग्रीव या पांढऱ्याशुभ्र, पुष्ट चार घोड्यांचा खरारा आजवर मी स्वत:च करीत आलो होतो. तो माझा मला सर्वात प्रिय असा नुसताच कर्मयोग नव्हता, तो सहज असा प्रेमयोगही होता.

Click here to Download Yugandhar PDF Book

‘घोडा’ या मला सर्वाधिक आवडणाऱ्या गतिश्रेष्ठ प्राण्यावरचा. त्यांच्या खराऱ्यासाठी लागणाऱ्या काटेरी रानवेळी या अरण्यात फिरून, निवडून मी नुकत्याच गोळा केल्या आहेत. त्यांची काटेरी पुरचुडी माझ्या पुष्कराजमंडित, अगदीधारी उजव्या मुठीत घट्ट धरलेली आहे. या पुष्कराजावर मस्तकावरच्या तळपत्या सूर्याची चिरतरुण किरणच किरण उतरलीत. माझ्या रक्तातील पेशीपेशींना या किरणांचा दाट चिरपरिचय आहे.

दिवस ग्रीष्माचे आहेत. या पर्णसंपन्न अश्वत्थाच्या पर्णांची निरामय स्वरसुंदर सळसळ अरण्यभर पसरलेली आहे. मला ती स्पष्ट ऐकूही येत आहे. या वृक्षाच्या बुध्याशी सावलीत मी माझं मस्तक विसावत ठेवलं आहे. माझा शतकोत्तर अचूकच सांगायचं, तर एकशे एकोणीस वर्षांचा उंच-निच निळसर-सावळा देह आता इथं शांत, शांत विसावला आहे. किती अब्द, अब्द पाहिलं, अनुभवलं, घडवलं, परतवलं, रुजवलं माझ्या या नीलवर्णी देहान! देहान?

For More PDF Book Click Below Links….!!!

Marathi Vyakaran PDF

Chhawa PDF

Yayati PDF

Durga Kavach PDF in Hindi

Hanuman Chalisa PDF

Durga Chalisa PDF

Shiv Chalisa PDF

Aditya Hridaya Stotra PDF

छे! त्यातील ‘श्री’ म्हणून विश्वमान्य झालेल्या अमर तत्त्वान! ‘वासुदेव’ म्हणून सर्वस्वीकृत झालेल्या अजर तत्त्वानं! रात्रीचं भोजन उरकलं. आज आमच्या अभिरभानृच्या ईशस्तवनात पाहुणे म्हणून आलेले अकरूरही बसले. त्यांच्या अचानक आगमनानं वाड्यातील प्रत्येक जण अस्वस्थ झाला होता. आपापल्या कक्षात ते नाना शंकांनी पछाडल्यानं शय्येवर तळमळू लागले. बाबांच्या शयनागारातील पलितेही बराच वेळ ढणढणत होते.

मी आणि बलरामदादाही शेजारी शेजारी उद्या मधुरेला जायचं, या विचारानं जागेच होतो. थोरली आणि भाकली, तर शय्येवर बसून होत्या. एकमेकींशी बोलताना मध्येच मुसमुसत होत्या. आम्हाला वाटलं होतं, प्रवासानं शिणलेले अक्रूरकाका शांत झोपले असतील. पण तसं काही घडले नव्हते. मध्यरात्रीचे टोल पडले आणि कक्षातून हाती टेंभा घेतलेले अक्रूरकाका बाबांसमोर उभे ठाकले. “नंदराज, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे एकांतात.

तू एकटाच माझ्या विश्रामकक्षात ये. प्रथम आपण दोघं बोलू. मग तुझे दोन्ही पुत्रही तिथं लागतील मला! चल.” अचानक आलेलं आमंत्रण, कंसाची कानावर आलेली कुख्याती यांनी गोंधळलेले बाबा अधिक गोंधळून राजमंत्र्यामागोमाग त्यांच्या कक्षात गेले.. अकुकरकाकांनी प्रथम दार लावून घेतलं. मग आपल्या कुरूर कंसराजाचा, धनुयांगाच्या निमित्तानं आखलेला कपटी बेत, दबक्या आवाजात बाबांच्या कानी घातला. Yugandhar PDF Book

“गोपराज नंददेवा, धनुयांग हे फसवं, खोटं आमंत्रण आहे. मथुरेत राजवाड्यावर तुझ्या दोन्ही पुतरांना कपटाने मारण्याचं कुटिल कारस्थान शिजतंय! तिथं मद्य पाजलेले प्रचंड हत्ती आणि तसलेच मल्ल तुझ्या पुत्रांवर अचानकच सोडले जाणार आहेत. त्यांना हत्तीच्या पायांखाली किंवा मल्लांच्या कातरीत कुचललं जाणार आहे. त्यांना आजच सावध केलं पाहिजे. जा, त्यांना घेऊन ये.” बाबा आमच्या कक्षात आले.

भेदरलेल्या बाबांनी अर्धवट झोपलेल्या मला व दादाला उठविलं. आणून अक्रूरकाकांसमोर उभं केलं. त्यांनी माझ्या डोळ्यांत खोलवर डोळे रोवून बोलायला सुरुवात केली. आम्ही पाहिलेला पहिलाच यादव केवढ्यातरी भारदस्त वाणीत बोलू लागला. त्यांचे शब्दन्शब्द ठिणग्यांसारखे उमटू लागले. मी कधीच घेतला नव्हता एवढ्या प्रचंड भावनिक कल्लोळाचा अनुभव त्या एकाच रात्री घेतला. माझ्या सगळ्याच प्रश्नांची धडाधड उत्तरं एकामागोमाग एक मला मिळत होती.

पण ती केवढ्यातरी विचित्र सत्याला धरून होती! ‘आज्ञा आर्य’ म्हणत सात्यकी निवडक शस्त्रधारी सैनिक घेऊन गुहेत शिरला. शंखासुराचं विधियुक्त दहन करण्याच्या आज्ञा मी केल्या. त्या ठिकाणाला ‘शंखोद्धार’ म्हणतच आमच्या सैनिकानी नौका हाकारल्या. त्या द्वीपातून दूरवर सागरात जात दुसऱ्या द्वीपाला जोडणारा स्पष्ट भूभागही आम्हाला दिसला. निळ्याशार लाटांचा पश्चिम सागर Yugandhar PDF Book

आम्ही खाडीतून ओलांडला. माझे लक्ष त्या हवेशीर द्वीपान पुरतच आकर्षून घेतल. दत्ताला समवेत घेऊन निघालेल्या आमच्या सेनेचा पहिलाच पडाव रेवतक पर्वताच्या पायथ्याशी पडला. याला ‘उज्जयंत ही म्हणत. या पर्वतावर रेवत कुलोत्पत्र ककुद्दिन राजाचं राज्य होते. पर्वत शिखरावरच त्याची रेवतनगर ही प्रशस्त राजनगरी होती. इथे थोडासा विश्राम घ्यायचा, अशी आमची योजना होती.

इथला रहिवास वाढेल, याची काहीच कल्पना कुणालाही नव्हती. आमची मनं ओढ घेत होती. अवंतीच्या आचार्य आश्रमाकडे जाण्यासाठी दिल्या वचनापुरमाणं दत्त या गुरुपुत्राला आश्रममातेच्या स्वाधीन करायचं होतं. त्यांचे मुखभर आशीर्वाद मस्तकी धारण करायचे होते. दुसऱ्याच दिवशी आमची सेना पहाटेची आन्हिक उरकत असताना पर्वतावरून आलेला एक राजदूत माझ्यासमोर राजा ककुदयिन यांचं भूर्जपत्र घेऊन उभा ठाकला.

त्यांनी आम्हा सर्वांना राजनगरीला भेट देण्यासाठी सहर्ष व सगौरव पाचारण केल होत.. आमचा सेनापती सात्यकी याला दत्तासह पुढे जाऊन क्षिप्रेच्या काठावर थांबण्याची मी सूचना दिली. तसा तो पुढे निघून गेला. मी, बलरामदादा, उद्धव व विपृथ् निवडक यादववीरांसह रेवतकाच्या राजदूतासमवेत तो उंचशील, घनदाट पर्वत चढू लागलो. रेवतकांचा राजा ककुदमिनान आमचं मोठं स्वागत केलं. Yugandhar PDF Book

भोजनोत्तर मौल्यवान अलंकार व गाई, अश्व भेट दिले. आणि सर्वात वडीलधारे म्हणून विपृथुसमोर एक अनपेक्षित प्रस्ताव ठेवला… “यादवांच्या ज्येष्ठ सुपुत्रान बलरामान माझी सुलक्षणी. विनयशील उपवर कन्या रेवती हिचं पत्नी म्हणून पाणिग्रहण करावं.” अमात्य अचानक समोर आलेल्या या पुरस्तावानं गोंधळलेच. त्यांना काय बोलावं ते सुचेना. “मी मी हा निर्णय कसा कसा” अमात्य अडखळले.

दादा माझ्याकडे बघुन एकदा केवळ मंदपणे काय तो हसला! त्याचा अर्थच होता की, हा प्रस्ताव आता मीच मार्गी लावावा. एव्हाना दादा, उद्धवानं आत्याबाईंचा चरणाशीर्वाद घेतला होता. आत्याबाईंनी डाव्या हाताशी असलेल्या, धिप्पाड गौर पुत्राच्या भक्कम दंडाला धरून पुढे खेचलं. त्या म्हणाल्या, “हा माझा भीम! याला आवरायचं म्हणजे वादळी वाऱ्यालाच आवर घालणं आहे. माझं सोडून कधीकाळी ऐकलं, तर हा काय ते केवल तुझंच ऐकेल!”

धिप्पाड भीमान मातेच्या कृतीवरून तिचा मनोदय ओळखला. पाठीशी उभ्या असलेल्या दोन भावांना पुढे घेत, माझ्या पायांवर घालत तो म्हणाला, “यादवा, माझ्यापेक्षा यांनाच तुझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे माझे प्रिय बंधु नकुल आणि सहदेव.” मी त्या छोट्या दोघांना वर घेत त्यांच्याकडे पाहिल. त्यातील नकुल तर खूपच सुंदर होता. तरतरीत नाकाचा, बांधीव यष्टीचा, कोकमगीर माझ्या उद्धवासारखा. Yugandhar PDF Book Download

अंतर एकच होते, उद्भव अधिक सोज्ज्वळ जाणवला असता, तोही मलाच भीमान मला प्रेमानं गाढ आलिंगनात घेतल. नुकतीच भूक शमलेल्या वनराज सिंहासारखी आता शांत शांत दिसू लागली त्याची मुदरा. मी अपार कौतुकानं माझ्या या चारही आतेबंधूच्या मुद्रा पांडुपुत्रांच्या चर्या एका दृष्टिक्षेपातच सर्व बारीक लक्षणांसह टिपल्या. आत-बाहेरच्या वास्तवासह मनी नोंदल्या. युधिष्ठिर उंचशील पसरट स्कंधाचा, उन्नत वक्षाचा.

गौरवर्णीय तरतरीत नाकाचा होता. तो शांत शांत मुद्रेचा होता. त्याची पुष्ट मान मात्र स्कंधापासून बरीच वर होती. त्याच्या भुवया कानशिलांकडे अधिक सरकल्या होत्या. कानशिलंही उंच, रक्तिम मासल पाळ्यांची व टपटपीत होती. माझ्यापेक्षा तो वयान थोडासा, पण ज्येष्ठच असेल. नेत्रकड़ा सदैव आरक्त असलेला भीमसेन शब्दशः पर्वतासारखा व वनराजासारखाच होता. वळलेल्या मुठीचा बळकट वज्रप्रहार त्याच्या वृक्षावर केला असता, तर ‘ठण्ण’ असा ध्वनी स्पष्ट उमटावा, असंच त्याचं वक्ष पुष्ट होते।

लोहरसाचं, भरदार. त्याचे विपुल, दाट कुरळे केश त्याच्या भक्कम स्कंधावर डौलात रुळत होते. त्याचा आवाज सार्धं बोलतानाही मृगाचे मेघ गुरगुरावेत तसा ऐकणाऱ्याला दडपून टाकणारा होता. तोही वयान माझ्यापेक्षा ज्येष्ठ होता. नकुल, सहदेव एकाच वयाचे, उंचीचे व अंगलटीचे होते. नर कपोतांच्या जोडीसारखे. दोघेही बोटीव यष्टीचे, तरतरीत दिसत होते. माझ्यापेक्षा थोडे कमी उंचीचे होते ते. Yugandhar PDF Book Download

भीमही तसाच, पण त्या दोघांच्याहून थोडासा उंच. मात्र माझ्यापेक्षा किंचित ढंगना. स्वामींच्या विचारांमुळे व प्रेमळ वागणुकीमुळे सर्व जण त्यांच्याकडे आपोआपच ओढले जात. ‘द्वारका’ हे नव्यान स्थापन केलेलं जनपद सर्वमान्य व्हावं, ही त्यांची धडपड होती. त्यासाठी ते आपल्या गरुडध्वजातून सिंधू- आर्यावर्तभर चौफेर अथक फिरले. या भ्रमंतीत त्यांची सारध्यसेवा करण्याचा मला सुयोग लाभला.

या सेवेमुळे द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराज आतबाहेर किती निकोप, निर्मळ आहेत, याच सर्वांगीण दर्शन मला घडलं. रोजच्या भरतीसाठी समुद्रकाठी रथातून फिरण, दोन महाजनपदातील राजधान्या गाठताना एका लयीत अंतर तोडणं आणि प्रत्यक्ष समरांगणावर शत्रूच्या शस्त्रराघातांत सारथ्य करणं, यात जसे अंतर आहे, तसं कुटुंबवत्सल स्वामी, सामाजिक आर्य, युद्धभूमीवरचे यादवश्रेष्ठ आणि ऋषिमुनीच्या सहवासात लीन झालेले सांदीपनी शिष्य अशा कितीतरी त्यांच्या विविधा जीवनच्छटा आहेत.

कुंभातून ओतल्यासारखा धो-धो सरळ कोसळणारा मुसळधार, वायुलहरीवर हिंदळत उतरणारा रिमझिमता, मध्येच थांबणारा, पुन्हा कोसळणारा, उन्ह-पावसाचा खेळ खेलणारा शरावणी, अशा पर्जन्याच्या असंख्य लयी असतात. अगदी तसंच आमच्या द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराजांचं जीवन होत. हाती कथनाचे सर्व वेग घेऊन हा रथ मी धावडव बघणार आहे. जमेल का ते मला? Yugandhar PDF Book Download

यत्न तर करायलाच हवा. माझ्या सारथी डोळ्यांत त्या युगंधर यादवांची मूर्ती मी कशी काय पकडणार? केवढी गगनव्यापी आहे ही मूर्ती! माझ्या सारथी जीवनाच्या गवाक्षातून जमेल तेवढ्या त्या गगनपुरुषाचं दर्शन मी घेणार आहे. तेच तुमच्यासमोर मांडणार आहे. ते दर्शन म्हणजे पूर्ण स्वामी नव्हेत. मी सांगतो आहे ते म्हणजे पूर्ण द्वारकाधीश नव्हेत.

त्यांनीच आपल्या प्रिय पत्नी रुक्मिणीदेवी व सत्यभामादेवी यांना एकदा आपल्या सुवर्णतुलेच्या मिषान पटवून दिल होत की, ‘भावभक्तीन अर्पण केलेलं तुलसीपत्रही माझी तुला करू शकतं. माझं हे कथन म्हणजे त्या तुलसीपत्रासारखंच आहे. इतर सातही राण्याहून रुक्मिणीदेवींचा स्वभाव व वागणं वेगळं होतं. त्यांचं दर्शन होताच माझ्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम उभी राही, ती स्वामीचीच मूर्ती.

त्या स्वामींची जशी काही सावलीच होत्या. स्वामींचा जसा जीवनाचा महामंतर होता परेमयोग!” तसाच त्यांची अर्धागिनी म्हणून रुक्मिणीदेवींचा जीवनमंत्र होता- ‘प्रेमयोग’ हाच. माझ्या इंद्रप्रस्थातील वास्तव्यात मी ज्या दोन स्त्रियांच्या अधिक निकट गेले, त्या म्हणजे माझ्या सासुबाई राजमाता कुतीदेवी आणि भगिनी सुभद्रा सुभद्रेला भेटल की, मला वाटे रुक्मिणीदेवीच भेटल्या. Yugandhar PDF Book Download

राजमाता कुंतीदेवी या प्रथम मला सासूबाई वाटल्या. पाच वीरपुत्रांची माता म्हणून त्या तशा होत्याही. सगळे इंद्रप्रस्थकर त्यांना राजमाता म्हणून आदरानं मान देत. त्यांचं बोलणं सुघड शिवालयातील घुमणाऱ्या मधुर घंटानादासारखं वाटे. त्यात ‘शिव’ तर असेच पण परिस्थितीचे टोल-तडाखे खाऊन मनाच्या गाभाऱ्यातून आलेला जाणता मधुरपणा असे. माझ्यासमोर आपल्या पाचही पुत्रांतील त्यांना जाणवलेला दोष त्या कधीच बोलून दाखवत नसत.

भरभरून बोलत त्या पुत्रांच्या केवळ गुणांबद्दल. आपल्या पुत्रांचे दोष माझ्या कानी घालण्याचं काम त्यांनी कृष्णावर सोपविलेलं असे. तोही ते कौशल्यानं पार पाडी. माझ्या सासूबाई राजमातापदाला सर्वस्वी साजेशा होत्या. कृष्णानं जसं आपलं द्वारका जनपद आर्यावर्तात मानमान्यतेला नेलं होतं, तसंच या राजमातानाही नवथर असलेलं आपलं इंद्रप्रस्थ गणराज्यही मानमान्यतेला न्यायचं होतं, आपली उत्तरदायी म्हणून त्यांनी सर्व कसोट्या लावून मला पारखलंही होतं.

माझ्या बालपणी जे काही संस्कार झाले, ते माता सौतामणीचे होते. इथे इंदरपुरस्थात महाराणी म्हणून माझ्या मनाची जी जडणघडण झाली, ती या राजमाता कुंतीदेवींच्या संस्कारांवर. I या संस्कारांत सर्वांत कठीण व गुंतागुंतीचा होता, तो माझ्या पाच पतीशी होणाऱ्या एकांतवासाचा संस्कार. त्यासाठी सर्वानुमते एक आचारसंहिता आम्ही सिद्ध केली होती. तिचे सर्व बारकावे राजमातेच्या सूचनेनुसार तयार झाले होते. जेव्हा मी पाचही बंधूची पत्नी व्हायचं ठरवलं. Yugandhar PDF Book Free

तेव्हा कांपिल्यनगर सोडतानाच राजमातेनं आपल्या पुत्रांना एक कठोर सूचना दिली होती. सर्वांनाच एकत्र घेऊन त्या म्हणाल्या होत्या “पांचालांची ही दीपदी तुम्हा सर्वांची पत्नी आहे हे जेवढं सत्य आहे, तेवढंच हेही सत्य आहे की, ती आता माझी पुत्रीच झाली आहे. तिच्या भवितव्याचं उत्तरदायित्व दोन नात्यांनी मला पार पाडावे लागणार. एक तिची सासू म्हणून आणि दुसरी तिची माता म्हणून. भिक्षा वाटून घेण्याचा माझा आदेश तुम्ही पाळलात.

तिची विभागणी होताच पूर्ण दक्षतेन मी दुसरा आदेशही देत आहे. “ती पत्नी म्हणून तुम्हा प्रत्येकाच्या एकांतात केव्हा व कशी यावी, हे मी ठरवेन. अर्थातच ते तुमच्या व तिच्या संमतीनंच असेल.” “तुम्हांपैकी प्रत्येकाच्या ठायी एक प्रबळ व अशरण क्षत्रिय वास करतो आहे. माझ त्यालाच आवाहन आहे. प्रत्येकांन क्षणभर नुसती कल्पना करून बघावी की, पांडवांसारखा पुरसंग आपल्यावरच आलाय.

आपण या सत्त्वपरीक्षेत कितपत टिकलो असतो, याच निर्विवाद उत्तर परस्पर प्रत्येकाला मिळेल. यासाठीच आता मी जे सांगतो आहे, ते ध्यानपूर्वक ऐकन प्रत्येकानं स्वतःचा असा योग्य निर्णय स्वत:शीच घ्यावा.. माझा तुमच्यातील निकोप आत्मशक्तीवर विश्वास आहे. “विराटांच्या या राजवेदीवरून हस्तिनापूरच्या कुरुना मी स्पष्ट स्पष्ट विचारतो आहे, आता तरी पांडवांना तुम्ही न्याय देणार आहात की नाही?” Yugandhar PDF Book Free

आपल्या निळ्या आकाशवाणीत तो धडधडीत सत्याचं सर्वांना तळपत्या सूर्यासारखं दर्शन घडवू लागला “अगदी बालपणापासून कौरवांनी दुर्योधन व त्याचे बंधू, शकुनी आणि त्याचे बंधू, त्यांचे सर्व साथीदार यांनी या पांडवांचा छळ मांडला आहे. कशासाठी? का? त्यांना ते अनाथ वाटले की काय? विराटाच्या राजनगरातून मी स्पष्टपणे घोषित करतो आहे की ते माझे. मी पारखलेले सर्वांत गुणवान असे आतेबंधू आहेत. उद्याच्या आर्यावर्ताचे ते निःसंशय नेते आहेत.

“मी शक्य ते सर्व यत्न करणार आहे. पण जेवढे म्हणून मला दुर्योधन- शकुनी समजले आहेत, त्यावरून निःसंशय खातरी आहे, ते पांडवांना सुखासुखी कधीच न्याय देणार नाहीत. आपल्या न्याय्य अधिकारासाठी त्यांना मिळेल ते सामर्थ्य एकवटून समरांगणात उतरावं लागेल. तिथेच त्यांना न्याय खेचून आणावा लागेल. तसा प्रसंग आलाच, तर विराटाच्या मत्स्यदेशान पांडवांच्या पाठीशी ठाम बळकटपणे ससैन्य उभ राहावे, असे मी आजच आवाहन करतो आहे.

विराटमहाराजांनी आपला एक पोक्त, शहाणा व अनुभवी राजदूत आजच हस्तिनापुराकडे कुरूच्या महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी पाठवावा. पांडवांचं इंद्रप्रस्थाचं गणराज्य त्यांना आता कौरवांनी सगौरव परत करावं, असा स्पष्ट संदेशही पाठवावा. “माझ द्वारका गणराज्य व स्वतः मी पांडवांच्या पहिल्या भेटीपासूनच त्यांचे झालो आहोत. त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहोत. जीवनभराच्या अनुभवाने एकच सांगतो, समरांगणात संहारक युद्ध केल्यामुळे जीवनाचे प्रश्न कधीच मिटत नाहीत. Yugandhar PDF Book Free

उलट ते अधिकच वाढत जातात, क्लिष्ट होतात. मानवी जीवन आहे त्यापेक्षा सुखद व सुसह्य करण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे प्रेम ! त्या निःसंशय प्रेमासाठी पांडवांच्या वतीनं या सभेतील विराट, पांचाल व यादव या गणराज्यांच्या वतीनं माझं हस्तिनापुराला आज प्रकट आवाहन आहे की, इंद्रप्रस्थाचा प्रश्न त्यांनी सामोपचारानं, प्रेमानं सोडवावा.

मी मात्र दिपून गेलो, तो य॒ज्ञानंतरच्या त्यांच्या झालेल्या एका दर्शनाने! इंदरपुरस्थात त्या दिवशी यमुनेकाठी पांडवांनी दिलेल्या भोजनाच्या पंक्तीमागून कितीतरी पंक्ती उठल्या. त्या पंक्तीच्या उष्टावलेल्या पत्रावळ्या काही क्षणांपूर्वी राजसूय यज्ञाच्या अग्रपूजेचा मान लाभलेल्या सुदर्शनधारी द्वारकाधीश यादवश्रेष्ठ कृष्णदेवांनी स्वतः उचलल्या होत्या. अर्जुनाच्या नंदिघोष रथाला, स्वतःच्या गरुडध्वज रथाला हाती लाकडी नळकांडी घेऊन वंगण घालताना ओळंबलेलं आम्ही त्यांना अनेकदा पाहिलं होतं.

राजसूयाच्या यज्ञमंडपात आमंत्रितांच्या उष्ट्या पत्रावळीही उचलताना त्यांना बघून मी केवळ थक्कच झालो होतो. खरोखरच पांडव भाग्यवान होते. द्वारकाकरांना असे कृष्णदेव कधी पाहायला मिळाले नव्हते. श्रावणात कधी ढगाआड जाणाऱ्या, कधी सर्वांगी प्रकटून नटलेली अवघी सृष्टी उजळून टाकणाऱ्या सूर्यदेवासारखंच त्यांचं पुरत्येक दर्शन होतं. प्रत्येकाला ते त्यांच्या क्षमतेप्रमाणे वेगवेगळं घडत गेलं होतं. Yugandhar PDF Book Free

मी झालं तरी किती म्हणून त्याच्या छटा सांगणार? एक सेनापती म्हणून माझ्या दृष्टीला त्यांचं जे जे दर्शन घडले, ते ते मी स्मरेल तसं सांगतो आहे. वीर पुरुष क्षमाशील असेलच, असे नाही. कठोरपणे ताडून बघताना आज मला जाणवतं, मीही तसा नव्हतो. यादवराज श्रीकृष्ण मात्र तसे होते. द्वारका सोडून निघून गेलेल्या मंत्री अक्रूराना, त्यांनी सुधर्मा राजसभेच्या मंत्रिगणांत पुन्हा सामावून घेतलं होतं.

स्यमंतक मणिरत्नाच्या निमित्तान अकराच्या हातून घडलेल्या तशा अक्षम्य अपराधाला त्यांनी विशाल मनी क्षमा केली होती. त्याचवेळी मला जाणवून गेलं होतं की, आपल्या नव्या गणराज्यातील कुठल्याही माणसाठायीची गुणवत्ता वाया जाऊ द्यायला ते कधीच तयार नव्हते. राजनीती चौफेर पचविलेले ते खऱ्या अर्थानं राजनीतिज्ञ होते. घरच्या भांडणात परक्याला हस्तक्षेप करू देण यासारखा मूर्खपणा नाही, हे तर ते चांगलंच जाणून होते. आपल्या सौभ विमानाचा वापर करून आर्यावर्तात कालयवनाला पाचारण करणाऱ्या शाल्वाला त्यांनी कालयवनासह धडा शिकविला.

Leave a Comment