The God of Small Things PDF in Marathi by Arundhati Roy

The-God-of-Small-Things-PDF-in-Marathi

Click here to Download The God of Small Things PDF in Marathi having PDF Size 3MB and No of Pages 483.

आयमेनेममधला मे महिना म्हणजे जिवाची उलघाल… काहिली! लांबलचक पसरलेले, सुस्त, आळसावलेले दिवस… कोरड्याठाक पडलेल्या नदीपात्राच्या काठानं उडणारी उष्ण धूळ… डेरेदार आम्रवृक्षांच्या हिरव्यागार कुशीत लपून घमघमत्या आंब्यांवर तुटून पडणारे कावळे… पिकून उललेली लाल केळी… झाडावरच फुटलेले पिवळेधम्म फणस… आणि उन्हाच्या झळांनी रणरणत्या हवेत दरवळणारा गोडूस वास… या वासाचा मार्ग काढत माश्यांचे थवे घोंघावत येत. कसल्यातरी विचित्र धुंदीत असल्यासारख्या या माश्या खिडक्यांच्या तावदानांवर आपटत आणि रणरणत्या उन्हात जीवघेण्या गिरक्‍्यांचा आकांत मांडून तडफडत मरून जात. निरभ्र, मोकळ्या आकाशाच्या कुशीत मे महिन्यातल्या रात्री…

The God of Small Things PDF in Marathi

Name of Book The God of Small Things 
Author Arundhati Roy
PDF Size 3 MB
No of Pages 483
Language Marathi
Buy Book From Amazon

About Book – The God of Small Things PDF in Marathi

सुस्त, आळसावलेल्या, अधुरेपणाचा शाप असलेल्या दुर्मुखल्या स्वप्नांसारख्या! …पण जून महिना येई, तोच मुळी उसळत्या पावसाचं धसमुसळं तुफान घेऊन… नंतरचे तीन महिने बारा-बादळ आणि बरसत्या पावसाची नुसती धुम्मस! ओथंबलेल्या आकाशात घेरून आलेले काळेभोर ढग थोडेसे उसवबले, तरच सूर्य दिसणार! मधूनच असं लखलखीत ऊन पडलं, की पावसापाण्यानं गारठलेली मुलं घराबाहेर धूम ठोकीत… ओल्याचिप्प अंगणात मग धसमुसळे खेळ रंगत… एकच गलका उठे! …आयमेनेममध्ये मृगाचा पाऊस असा सरीसरींनी धावत आला की आजूबाजूची खेडी हिरवीकंच होऊन जात. मूळ धरून रसरसलेल्या टॉपिओकाच्या वेली गर्भारशा दिसत. शेवाळ्यानं झाकून गेलेल्या विटांच्या भिंती… विजेच्या खांबांना कवटाळून सरसरत वर झेपावणारे मिरवेल… The God of Small Things PDF in Marathi सैरावैरा धावणाऱ्या पाणलोटांच्या जबरदस्त मुसंडीनं धुपून गेलेले लाल मातीचे रस्ते… कुठून कुठून वाहून आलेल्या राक्षसी रानवेलींचं अस्ताव्यस्त जंजाळ… पावसाने असा आकांत मांडला, की घराबाहेर पडून बाजारात जायचं, तरी उफाळत्या पाण्यात होडी लोटावी लागे…

काळ्या कुळकुळीत डांबरी रस्त्यांवर पडलेले खडे गढूळ पाण्यानं भरून जात आणि नदीतून वाहून आलेले छोटेछोटे मासे या खड्ड्यांमध्ये मजेत बागडताना दिसत. राहेल आयमेनेममध्ये परत आली, तेव्हा पावसानं अखंड झड धरली होती. आकाशातून पृथ्वीवर अग्निलोळांचा वर्षाव चालू असावा, तसा विजांचा कडकडाट… लखलखत्या तलवारीचं जीवघेणं पातं फिरावं तशा आकाशभर धावणार्‍या अग्रिरेखा… अशा कल्लोळात राहेल परतली. टेकडीवरचं तिचं जुनं घर पावसानं काकडून गेलं होतं.

एखादी जुनी हॅट कानांवरून मानेपर्यंत ओढून घ्यावी, तसं डोक्यावरचं छप्पर ओढून घराचा डोलारा उभा होता. हिरव्यागार शेवाळ्यानं भरून गेलेल्या भिंतींना ओल आली होती. जमिनीतून झिरपलेलं पाणी चहूदिशांनी पसरत चाललं होतं. त्या जुन्या घराचा जीर्ण डोलारा सावरणार्‍या भिंतींच्या ढासळत्या मजबुतीवर मऊसर, कोंदट ओल चढत चालली होती. बेलगाम वाढलेल्या जंगली झाडोरऱयाचं तण माजलेल्या बागेत छोट्या- मोठ्या जिवांची खुसफूस सुरू झाली होती. बागेतल्या एका कोपऱयात ओलसर चमकत्या दगडाभोवती वेटोळं घालून सुस्त पडलेला साप…

For More PDF Book Click Below Links….!!!

Eat That Frog PDF

Think and Grow Rich Marathi PDF

The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi

The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi 

Cashflow Quadrant PDF in Marathi 

How to Win Friends and Influence People PDF in Marathi

लालभडक गढूळ पाण्याच्या डबक्यात जोडीदाराच्या शोधात भटकणारे, संभोगासाठी आक्रोश करणारे पिवळे बेडूक… बागेतून घराकडे येणार्‍या, कुजलेल्या पाल्यापाचोळ्याच्या ढिगाने झाकलेल्या छोट्या रस्त्यावर मधूनच दिसणारं ओलंचिंब, निथळत्या अंगाचं मुंगूस… …घरही रिकामं, भकास! कडीकोयंडे लावून बंद केलेली दारं… भिंतीच्या कचाट्यातून निखळत चाललेल्या खिडक्या… आणि ओकाबोका, उदास व्हरांडा…! पण फिकट निळ्या, आकाशी रंगाची प्लायमाऊथ मात्र अजूनही पुढच्या दारी उभी होती… आणि त्या उदासवाण्या घराच्या एका कोपऱ्यातली बेबी कोचम्मा… तीही अजून जिवंत होती! बेबी कोचम्मा…

राहेलची आत्या-आजी, तिच्या आजोबांची धाकटी बहीण! खरं म्हणजे तिचं नाव होतं नवोमी… नवोमी आयपे! पण सगळे जण तिला बेबी कोचम्माच म्हणत. अगदी आत्याबाई, मावशीबाई व्हायच्या वयात ‘बेबी’ हे संबोधन तिच्या नावामागं चिकटलं, ते चिकटलंच. अर्थात, राहेल आयमेनेममध्ये आली, ती आपल्या आत्याला भेटायला नव्हे!… The God of Small Things PDF in Marathi आत्याही काही तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली नव्हती. भर पावसात राहेल धडपडत आली होती, तिच्या भावाला भेटायला. -इस्था! – राहेलचा जुळा भाऊ. स्वतंत्र्य अस्तित्व असलेली, स्वतंत्र बीजांमधून जन्मलेली; तरीही एकाच नाळेची, पाठीला पाठ लावून आलेली जुळी भावंडं! इस्था…

इस्थापन राहेलपेक्षा फक्त अठरा मिनिटांनी मोठा होता. जुळी भावंडं खरी… पण इस्था आणि राहेल कधीच एकमेकांसारखे दिसले नाहीत. अगदी काटकुळ्या अंगाची, सपाट छाती-पोटाची शाळकरी पोरं असतानाही इस्था आणि राहेलनं कधी कुणाला बुचकळ्यात टाकलं नाही. इस्था कोण आणि राहेल कोणती? – असा प्रश्नच कधी कुणाला पडला नाही. एरवी जगभरातल्या जुळ्या भावंडांच्या हुबेहूब सारखेपणाला फसून मग उगीचच दात काढणारे नातेवाईक, देणगी मागण्यासाठी आयमेनेममधल्या घरी येणारे सनातनी सीरियन धर्मोपदेशक…

यांतलं कुणीच कधी इस्था-राहेलच्या जुळेपणाला फसलं नाही. …तरीही पेच होताच! पण तो फार खोलवर… अगदी रक्तात भिनलेला… इस्था आणि राहेल यांच्या अस्तित्वाशीच जखडलेला! या अजोड नात्याची वीण घालणारे सुरुवातीचे दिवस… तेव्हा तर सगळंच नवंकोरं, ताजंतवानं होतं. The God of Small Things PDF in Marathi प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ फक्त दिसत होता. सगळं काही संपून जाण्याच्या, हरवण्याच्या भावनेचा स्पर्शही न झालेलं अखंड, अमर्याद आयुष्य इस्था आणि राहेलसमोर उलगडत होतं.

आयुष्याभोवती वेढून असणारा ‘अटळ विनाशा’चा शाप समजुतीच्या पार पलीकडं असताना वाट्याला येणारे ते कोवळे, निरभ्र दिवस! त्या काळात इस्था आणि राहेल… दोघांचं मिळून एक ‘अस्तित्व’ होतं; पण ‘ओळख’ होती, ती मात्र स्वतंत्र… वेगवेगळी. जणू सयामी जुळ्यांची एक वेगळीच निपज… दोघांची शरीरं एकमेकांपासून स्वतंत्र, अलग… तरीही ‘व्यक्तित्व’ मात्र एकच – अभिन्न! एका रात्री इस्थाला काहीतरी भलतंच विनोदी स्वप्न पडलं, म्हणून अर्ध्या झोपेतून जागी होऊन खळखळून हसत सुटलेली राहेल…

आता इतक्या वर्षांनी तिला आठवतंय तिचं ते हसणं. तिच्या स्मरणातल्या अशा अनेक आठवणी… ज्या खरं म्हणजे, तिच्या नाहीत… नव्हत्याच! जसं, की ‘अभिलाष’ टॉकीजमधलं ते गुपित! खरं तर, राहेल तिथं नव्हतीच त्या वेळी; पण ‘ऑरेंजर्ड्रिक… लेमनर्डिक’वाल्या त्या माणसानं इस्थाशी काय केलं, ते तिला पक्कं ठाऊक होतं. शिवाय ते टोमॅटो सॅण्डविच. मद्रास मेलमध्ये इस्थानं खाल्लेलं… इस्थाचं सॅण्डविच! पण राहेलच्या जिभेवर अजून रेंगाळतेय त्याची चव! …या अगदी छोट्या गोष्टी… किरकोळच, खरं म्हणजे. …Click here to Download The God of Small Things PDF in Marathi

When Bad Things Happen to Good People PDF in Marathi

The Alchemist PDF In Marathi

Rich Dad Poor Dad Marathi PDF

The Power of Habit Marathi PDF Book

The 5 Am Club PDF In Marathi

पण आता बदललंय सगळं. ‘स्वतंत्र’ असूनही पूर्वीचं ते ‘अभिन्न’ असणं… नाही उरलं आता. नाहीच. दोघांच्याही वाटा सुट्या झाल्या. आयुष्यं वेगळी झाली. वेगळी होऊन अर्थपूर्ण झाली. इस्थाला आता ‘त्याच्या’ स्वतंत्र आयुष्याचा संदर्भ आहे आणि राहेलला ‘तिच्या’… कडा घासल्या गेल्या. कंगोरे, कोपरे तासले गेले. अमर्याद भासणाऱ्या पायांखालच्या वाटेवर अर्धविराम, पूर्णविराम साकळले… लसलसत्या रक्ताच्या थेंबासारखे! अधुऱया, अपुऱ्या वर्तमानाच्या लांबलचक सावल्या घेरून आल्या आणि त्या सावल्यांच्या धगीत होरपळलेल्या डोळ्यांभोवती स्वीकाराचे, समजुतीचे अर्धचंद्र साकळले. बघता-बघता दोघांचं वय झालं – अम्मूएवढं.

Leave a Comment